AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi : पीएम मोदींच्या मध्यरात्रीच्या संबोधनानंतर राहुल गांधींच्या 3 मागण्या, पहिली मागणी ‘आम्हाला राजीनामाच हवा’

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा पेपर लीकच्या मुद्यावर विद्यार्थ्यांना संबोधित केलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी केला. या संदेशावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Rahul Gandhi : पीएम मोदींच्या मध्यरात्रीच्या संबोधनानंतर राहुल गांधींच्या 3 मागण्या, पहिली मागणी 'आम्हाला राजीनामाच हवा'
Rahul Gandhi
| Updated on: Jul 24, 2026 | 9:24 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा पेपर लीकच्या मुद्यावर विद्यार्थ्यांना संबोधित केलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी केला. या संदेशावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘आमचे विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहेत’ असं राहुल गांधी यांनी पीएम मोदींच्या व्हिडिओ संदेशावर म्हटलं आहे. “या पथॅटिक अर्ध्यारात्रीच्या व्हिडिओवरुन त्यांच्या इंटेलिजेंसचा अपमान करु नका. प्रधान यांना बर्खास्त करा, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांना शिक्षा द्या आणि माफी मागा” अशी मागणी राहुल गांधी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन केली आहे.

“पेपर लीक हा काही किरकोळ विषय नाही. पेपर लीकमुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना त्रास झाला. मागच्या अडीच महिन्यात पेपर लीकच्या घटनेनंतर सरकारने अनेक पावलं उचलली आहेत. दोषींना अटक करुन तुरुंगात पाठवलं आहे” असं पीएम मोदी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हणाले. “विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये ही सरकारची जबाबदारी होती. म्हणूनच कमीत कमी वेळेत जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्यात आली. 19 तारखेला परीक्षेचे निकाल सुद्धा जाहीर केले” असं पीएम मोदी म्हणाले.

फक्त इतक्या कारवाईने समाधानी होणार नाही

सरकार फक्त इतक्या कारवाईने समाधानी होणार नाही असं पीएम मोदी व्हिडिओमध्ये म्हणाले. त्यांनी संबंधित विभागांना पेपर लीक विषयात फास्ट ट्रॅक कोर्ट बनवण्याचे निर्देश दिले. विभागांनी सतत मेहनत करुन रात्री उशिरा या संबंधीचा मसुदा सोपवला.

उपोषण काल रात्री संपलं

नीट पेपर लीक प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी उपोषण सुरु केलं होतं. 26 दिवसांपासून सुरु असलेलं हे उपोषण काल रात्री संपलं. जेपी नड्डा यांच्या हाताने ज्यूस पिऊन वांगचूक यांनी उपोषण सोडलं. सरकारकडून काही आश्वासन घेतल्यानंतर वांगचूक यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान हिंसाचारही झाला आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच