सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी राहुल गांधी गंगाराम हॉस्पिटलमध्ये; आईची काळजी घेण्यासाठी रात्रभर थांबणार

| Updated on: Jun 17, 2022 | 2:44 AM

सोनिया गांधी यांना 2 जून रोजी कोविड-19 संसर्ग झाल्याने त्या रविवारपासून रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना घशातील त्रास संभवत असल्याने आणि कान-नाक-घसा याचा त्रास झाल्याने त्यांच्यावर तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत

सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी राहुल गांधी गंगाराम हॉस्पिटलमध्ये; आईची काळजी घेण्यासाठी रात्रभर थांबणार
राहुल गांधींनी सोनिया गांधी गंगा राम हॉस्पिटलमध्ये घेतली भेट
Follow us on

नवी दिल्लीः काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Congress President Sonia Gandhi) गेल्या 12 जूनपासून कोरोना (Corona) बाधित असल्यामुळे त्या दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या या आजारपणामुळे ईडीकडे चौकशी सुरू असतानाही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शक्रवारी आपल्याला चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नसून आई आजारी असल्याने आपण रुग्णलयात थांबणार असल्याने चौकशीला उपस्थित राहणार नसल्याची परवानगी मागितली होती. ती विनंती ईडी अधिकाऱ्यांनी मान्य केल्यानंतर राहुल गांधी गुरूवारी मध्यरात्रीच सर गंगा राम रुग्णालयमध्ये आपली आई सोनिया गांधी यांना जाऊन भेटले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी रात्रभर सोनिया गांधी यांच्याजवळच थांबणार आहेत.

 

खासदार राहुल गांधी यांची गेल्या तीन दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांच्या या चौकशीमुळे देशभरातील काँग्रेस नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.

चौकशी 17 ते 20 जून पुढे ढकलली

गुरूवारीही त्यांची चौकशी करण्यात आली त्यावेळी राहुल गांधी आपल्या आईची तब्बेतीचे कारण देत नॅशनल हेराल्ड प्रकरणी सुरु असलेली चौकशी 17 जून ते 20 जून या कालावधीत पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

सोनिया गांधी कोरोनाबाधित

ईडीकडून चौकशी सुरू असतानाच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ईडी अधिकाऱ्यांकडे 17 जून ते 20 जून या कालावधीत चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली होती. कारण सोनिया गांधी कोरोनाबाधित असल्याने त्यांच्या जवळ थांबण्यासाठी त्यांनी ही परवानगी मागितली होती. त्यामुळे गुरूवारी मध्यरात्रीच राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांची काळजी घेण्यासाठी रुग्णालयातच थांबण्याचा निर्णय घेतला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

कान-नाक-घसा याचा त्रास

सोनिया गांधी यांना 2 जून रोजी कोविड-19 संसर्ग झाल्याने त्या रविवारपासून रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना घशातील त्रास संभवत असल्याने आणि कान-नाक-घसा याचा त्रास झाल्याने त्यांच्यावर तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत.

राहुल गांधी आई सोबत थांबणार

नॅशनल हेराल्ड प्रकरणी खासदार राहुल गांधी यांची गेल्या तीन दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी होत आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांची कन्या प्रियांका गांधी यांनी त्यांची रुग्णालयात थांबून काळजी घेतली. राहुल गांधी यांना चौकशीसाठी शुक्रवारी पुन्हा हजर राहण्यास सांगिण्यात आले होते, मात्र त्यावेळी राहुल गांधी यांनी आपल्याला 17 तारखेला चौकशीपासून सूट देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्याच तब्बेतेचे कारण सांगितले होते. त्यांची विनंतीही ईडी अधिकाऱ्यांकडून मान्य करण्यात आली.

चौकशी करणे म्हणजे राजकीय सूड

सलग तिसऱ्या दिवशीही राहुल गांधी चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहिले आहेत. त्यानंतर रात्री 9 वाजता ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले तेव्हा पक्षातील जेष्ठ नेत्यांनी या चौकशीवर टीका करत याप्रकरणात काही तथ्य नसल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींची चौकशी करणे म्हणजे हा राजकीय सूड असल्याचा आरोपही त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे.