ज्ञानेश कुमार खूप झालं… आता राजीनाम्याची वेळ, राहुल गांधी यांची थेट पोस्ट, दिल्लीतील..

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार विरोधात इंडिया आघाडी आक्रमक भूमिका घेत आहे. त्यातच दिल्लीत मोठा मोर्चा निघाला आहे. दिल्लीत मोठी घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच आता राहुल गांधी यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

ज्ञानेश कुमार खूप झालं... आता राजीनाम्याची वेळ, राहुल गांधी यांची थेट पोस्ट, दिल्लीतील..
Rahul Gandhi and Gyanesh Kumar
| Updated on: Oct 06, 2026 | 12:40 PM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दिल्लीत इंडिया आघाडीने मोठा मोर्चा काढला आहे. काही खासदार रस्त्यावर ठिय्या करण्यासाठी पोहोचले आहेत. इंडिया आघाडीचे नेते उपस्थित आहेत. दिल्लीत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. लोकशाही वाचवा, ज्ञानेश कुमारांना हटवा, अशा घोषणा दिल्या जात आहेत. आता पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, असे स्पष्ट विरोधकांनी केले. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्षाच्या खासदार रस्त्यावर आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरीही खासदारांचा ठिय्या सुरूच आहे.

दिल्लीतील या आंदोलनाकडे सर्वांच्या नजरा आहेत. यादरम्यान राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. राहुल गांधी यांनी या मोर्चाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव आणि अन्य काही नेते दिसत आहेत. सगळ्यांच्या हातात फलक बघायला मिळत आहेत.

Loading...

राहुल गांधी यांच्या हातात  ज्ञानेश… आता झालंय सगळं…असे लिहिलेले फलक आहे. हा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी यांनी लिहिले की, ज्ञानेश, झालं आता… राजीनामा देण्याची वेळ आली आहे… #IndiaAllianceMarch आता राहुल गांधी यांची ही सोशल मीडियावर पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. विरोधक चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत.

अखिलेश यादव यांच्या पक्षाचेही खासदार या मोर्चात सहभागी आहेत. राहुल गांधी आकाशवाणी भवनात पोहोचले आहेत. अभिषेक बनर्जीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. यासोबतच 10 ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीचा मोर्चा दिल्लीत आहे. सीजेपीने मोठा इशारा दिला. ज्ञानेश कुमार यांच्या मोर्चासाठी सीजेपीही आक्रमक भूमिका घेत आहे. मुंबईत नुकताच त्यांनी आंदोलन केले. यावेळी त्यांच्याकडून मुंबई पोलिसांचे काैतुक करण्यात आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us