Rahul Gandhi Twitter : मतदार वाढत नाहीत म्हणून निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार का, राहुल ट्विटप्रकरणी नेटकऱ्यांत जुंपली !

| Updated on: Jan 27, 2022 | 1:37 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरला लिहिलेल्या पत्रावरून आता ट्विटरवर जोरदार खडाजंगी रंगलीय. राहुल गांधी यांनी 27 डिसेंबरला ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिले आहे. त्यात ट्विटरला आपल्या नव्या फॉलोअर्ची संख्या घटल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

Rahul Gandhi Twitter : मतदार वाढत नाहीत म्हणून निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार का, राहुल ट्विटप्रकरणी नेटकऱ्यांत जुंपली !
राहुल गांधी, काँग्रेस नेते
Follow us on

नवी दिल्लीः काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटरला (Twitter) लिहिलेल्या पत्रावरून आता ट्विटरवर जोरदार खडाजंगी रंगलीय. राहुल गांधी यांनी 27 डिसेंबरला ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिले आहे. त्यात ट्विटरला आपल्या नव्या फॉलोअर्ची संख्या घटल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. सुरुवातील दरमहा राहुल गांधी यांच्या ट्विटरला फॉलो करणाऱ्यांची संख्या दरमहा 2.3 लाख होती. ती 6.5 लाखांवर पोहोचली होती. मात्र, ऑगस्ट 2021 नंतर ती संख्या दरमहा अडीच हजारांवर आली आहे. राहुल गांधींनी या काळात त्यांचे 19.5 दशलक्ष फॉलोअर्स गोठवण्यात आल्याचे म्हंटले आहे.

कुठून झाली सुरुवात?

राहुल गांधी यांनी ऑगस्ट 2021 अत्याचारग्रस्त पीडितेच्या कुटुंबाचा फोटो ट्विट केला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी ट्विटरकडे तक्रार केली. ट्विटरचे नियम राहुल गांधी यांनी मोडल्याने त्यांचे अकाऊंट आठ दिवसांसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आले होते. काँग्रेसने त्या घटनेपासून राहुल गांधी यांच्या नव्या फॉलोअर्सची संख्या घटत चालली असल्याचे म्हटले आहे. यावरून ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

प्यादा बनण्यापासून चेतावणी…

राहुल यांच्या ट्विटप्रकरणावर राहुल शिवशंकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रिय पराग…राहुल गांधींनी ट्विटर फॉलोअर्समध्ये झपाट्याने घसरण होत असल्याचा दावा करत या एसएम प्लॅटफॉर्मला “प्यादा” बनवू नये असा, सावधगिरीचा इशारा दिला आहे. कॉंग्रेस “चीफ-इन-वेटिंग” साठी ही ऑन-लाइन अशुभघंटा आहे. राहुल यांच्या ट्विटरवर रोहन दुआ यांनी हा विचित्र लोभ आणि धक्कादायक तळमळ असल्याचे म्हटले आहे.

तर निवडणूक आयोगाला दोष देतील…

ऋषी बागरी यांनी याप्रकरणी राहुल यांधी यांच्यावर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, अमेठी हरल्यावर ईव्हीएमला दोष देतात. आता फॉलोअर्स गमावल्यावर ट्विटरला दोष देतात. काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडला, तेव्हा भाजपला दोष देतात. आता त्यांचा पक्ष राज्याच्या निवडणुका हरेल, तेव्हा मतदारांना दोष द्या, अशी तिरकस टिप्पणी त्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्यानेही अशीच टीका केली आहे. तो म्हणतो, फॉलोअर्स वाढत नाहीत म्हणून राहुल गांधी ट्विटर सीईओ पराग अग्रवाल यांच्याकडे तक्रार करत आहेत. मग आता यांना निवडणुकीत जनेतेने मते दिली नाहीत, तर ते निवडणूक आयोगाला दोषी मानतील.

आभासी जगातही प्रेक्षक मिळेना…

अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 2021 मध्ये खाते तात्पुरते निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली नसल्याची तक्रार राहुल गांधी यांनी ट्विटरवर केली आहे. राहुलला खऱ्या जगात आणि आता आभासी जगातही प्रेक्षक मिळत नाहीत! पुढे काय? निवडणूक आयोगाला पत्र लिहून मते न मिळाल्याची तक्रार करणार का, असा सवालही केला आहे.

बनावट फॉलोअर्स

आलोक भट्ट आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, नुकताच @राहुलगांधी रडत गेला आणि निवडणूक जिंकू शकला नाही म्हणून अमेरिकेचे समर्थन मागितले. तर अंकुर सिंग यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर राहुल गांधी निवडणूक आयोगाला मतदार वाढ नाहीत म्हणून पत्र लिहिणार असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने ट्विटर तुमचे मोठ्या प्रमाणात बनावट फॉलोअर्स असल्याचे सांगत असल्याचे म्हटले आहे.

इतर बातम्याः

Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!

Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना

National Children’s Award | 14 किलोमीटर खाडी 4 तास 9 मिनिटांत पोहून पार; ‘स्वयंम’च्या यशाने पंतप्रधानही भारावले…!