
RailOne App Launched: रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन सुपर एप ‘RailOne’ लाँच केले आहे. या मोबाईल एपवर रेल्वे संबंधित सर्व सेवा एकाच जागी मिळणार आहेत. आता तिकीट बुकींग, ट्रेनची माहीती, प्लॅटफॉर्म तिकीट, तक्रार आणि फिडबँकसारख्या सेवा एकाच एपवर मिळणार आहे. चला तर या संदर्भात विस्ताराने जाणून घेऊयात…
सर्व सेवा एकाच एपमध्ये – आता प्रवाशांना तिकीट बुकींग, ट्रेनची स्थिती, पीएनआर स्टेटस, कोच पोझिशन, रेल्वे मदत आणि प्रवासासंबंधीत तक्रारी देण्याची सोय यासाठी वेगवेगळे एप डाऊनलोड करण्याची काही गरज नाही.
सिंगल साईन-ऑन फिचर- RailOne ऐपमध्ये एकाच लॉगिनवर सर्व सेवांचा लाभ मिळवता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवण्याची काही गरज राहणार नाही.
जुन्या एप्सचे युजर देखील लॉग इन करु शकणार – ज्या युजर RailConnect वा UTSonMobile या मोबाईल एपचा वापर आधीपासून करत असतील ते देखील आता RailOne लॉगिन करु शकणार आहेत.
R-Wallet सुविधा – या एपमध्ये रेल्वेच्या ई-वॉलेट अर्थात R-Wallet ची सुविधा देखील देण्यात आली आहे. युजर mPIN वा बायोमेट्रिक कोडद्वारे लॉग इन करु शकणार आहेत.
नवीन रजिस्ट्रेशन देखील सोपे – नवीन युजरसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रीया एकदम सोपी करण्यात आलेली आहे. केवळ मोबाईल क्रमांक वा OTP ने लॉग इन करणे आता शक्य आहे.
एप डाऊनलोड- हे एप्स एंड्रॉईड प्ले स्टोअर वा एप्पल एप्स स्टोअर दोन्हींवर उपलब्ध आहे.
आतापर्यंत रेल्वेच्या विविध कामांसाठी वेगवेगळे एप्स वापरले जात होत होते. आता मात्र एकाच एप्सवर सर्व सुविधा मिळणार आहेत.
आतापर्यंत प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी IRCTC Rail Connect, जेवण ऑर्डर करण्यासाठी eCatering,तक्रारींसाठी Rail Madad, अनारक्षित तिकीट बुकींगसाठी UTS एप्स आणि ट्रेनची स्थिती जाणण्यासाठी National Train Enquiry System सारखे वेग-वेगळे ऐप्सचा वापर करावा लागत होतो. RailOne ने या सर्व बाबींना एकाच ठिकाणी आणून रेल्वे प्रवास सोपा केला आहे.
रेल वन सुपर एप्सच्या लॉन्च बरोबरच, भारतीय रेल्वे यात्री रिझर्व्हेशन सिस्टममध्ये तीन मोठे बदल देखील केले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवास आणखीन सोपा केला आहे.
आधी चार्ट ट्रेन सुटण्याच्या चार तास आधी तयार होत होता. परंतू नव्या नियमानुसार ट्रेनचा चार्ट ८ तास आधी तयार होणार आहे.
दुपारी २ वाजता सुटणाऱ्या ट्रेनचा चार्ट रात्री ९ वाजता तयार होणार आहे.त्यामुळे वेटींग लीस्ट असलेल्या प्रवाशांना लवकर तिकीट कन्फर्म झाले का नाही ते कळेल.
1 जुलै 2025 पासून केवल व्हेरिफाइड यूजर्सना तत्काल तिकीट बुक करता येणार आहे.
आधार वा DigiLocker कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन होणे गरजेचे असणार आहे.
OTP आधारित व्हेरिफिकेशन जुलै अखेर पर्यंत लागू केले जाणार आहे.
रिझर्वेशन सिस्टममध्ये अपग्रेड ( डिसेंबर 2025 पर्यंत ):
रेल्वेची RailOne app, Indian Railways app, IRCTC ticket booking, train status tracking, railway wallet R-Wallet, Tatkal booking update, train chart preparation, RailOne features, RailOne download, railway reservation system, RailOne ऐप, भारतीय रेलवे ऐप, रेलवे टिकट बुकिंग, IRCTC ऐप तांत्रिक शाखा CRIS नवीन सिस्टमवर काम करीत आहे
आता एकाच वेळी 1.5 लाख तिकीट बुकिंगची क्षमता वाढणार आहे.
दर मिनटांना 40 लाखाहून ज्यास्त क्वेरी प्रोसेस होणार आहे.
नवीन इंटरफेस अनेक भाषात असणार आहे
दिव्यांगजन, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी विशेष सुविधा असणार आहेत.