Indian Railways: डिझेल इंजिन रिटायर, 20 कोटींच्या इंजिनाची एक-एक कोटीत भंगारात विक्री
Indian Railways: डिझेल इंजिनच्या विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा काढण्यात आली. श्रीलंका, बांगलादेश, नेपाळला बोलवण्यात आले. परंतु या देशांनीही डिझेल इंजिन खरेदीत रस दाखवला नाही. त्यामुळे शेवटी डिझेल इंजिनाची विक्री रेल्वेला भंगारात करावी लागली.

Indian Railways: ‘झुक झुक झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत गाडी’ हे गाणे ऐकून आणि वाफेचे इंजिन पाहणारी पिढी आता साठीत आहे. त्या पिढीने कोळसा इंजिनापासून वंदे भारतच्या सेमी हायस्पीडपर्यंत रेल्वे इंजिनाचा प्रवास पाहिला आहे. त्या पिढीने वाफेचे इंजिन इतिहास जमा होताना पहिले आहे. भारतीय रेल्वेने १९९७ मध्येच वाफेचे इंजिन निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. वाफेच्या इंजिनांचा वापर पूर्णपणे बंद केला. कोळसा जाळून वाफ निर्माण करणाऱ्या इंजिनाची जागा डिझेल इंजिनाने घेतली. आता डिझेल इंजिन इतिहास जमा होऊ लागले आहेत. वाफेच्या इंजिनांच्या तुलनेत डिझेल इंजिने अधिक कार्यक्षम होती. त्यांची देखभाल कमी करावी लागत होती. परंतु आता आणखी नवीन तंत्रज्ञान आले. यामुळे रेल्वे सर्व डिझेल इंजिन निवृत्त केले जात आहे. त्याची जागा इलेक्ट्रीक इंजिन घेत आहेत. नुकतेच पश्चिम मध्ये रेल्वेने त्यांच्याकडे असलेली सर्व डिझेल इंजिन विक्रीसाठी भंगारात काढले आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढण्यात आली. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने भंगारात डिझेल इंजिनाची विक्री होत आहे. ...
