
भारतीय रेल्वेचा प्रवास सर्वात स्वस्त आणि इतर वाहतूक साधनांच्या तुलनेत आरामदायी असल्याने रेल्वेच्या लांबपल्ल्या तिकीटांना प्रचंड मागणी असते. मात्र, मागणी जादा आणि गाड्यांचे डबे कमी असल्याने भारतीय रेल्वेने आता तत्काळ तिकीटांच्या बाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. या पुढे तत्काळ तिकीट काढताना या अटी आणि नियम पूर्ण करणाऱ्यांनाच तत्काळ तिकीट बुक करता येणार आहे. तत्काळ तिकीटांचा योग्य वापर व्हावा या उद्देश्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
येथे पाहा पोस्ट –
Bharatiya Railways will soon start using e-Aadhaar authentication to book Tatkal tickets.
This will help genuine users get confirmed tickets during need.
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 4, 2025
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या तिकीटाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने रेल्वेच्या तत्काळ तिकीटांचा ऊठसुठ वापर रोखला जाणार आहे. तत्काळ तिकीटांची ऑनलाईन बुकींग आता त्याच व्यक्तींना करता येणार आहे. ज्यांच्या आधारकार्डचे ई- ऑथेंटीकेशन पूर्ण झालेले आहे. या बाबत रेल्वे मंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यांचे आधारकार्डचे ऑनलाईन पडताळणी झाली आहेत. त्यांनाच आता तत्काळ तिकीटांच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे.
रेल्वेच्या तिकीटांची मागणी सुटीच्या हंगामात आणि सणासुदीला टीपेला जाऊन पोहचते. या वेळी तिकीटांची भली मोठी वेटींग लीस्ट प्रवाशांच्या हाती पडत असते. त्यामुळे प्रवाशांना शेवटच्या घटकेपर्यंत प्रवास करायचा की नाही हे समजत नाही. त्यामुळे जर वेटींग तिकीट कन्फर्म झाली नाही तर अन्य वाहतूक मार्गाने प्रवास करावा. लागतो. तसेच रेल्वेच्या तिकीट आरक्षणाचा कालावधी देखील खूप मोठा असतो. एवढ्या आगाऊ कोणत्याही प्रवासाचे नियोजन करणे अवघड असते. त्यासाठी आयत्यावेळी जादा पैसे मोजून प्रवास करता यावा यासाठी तत्काळ तिकीटांची योजना आणण्यात आली. परंतू या सुविधेचा गैर वापर करणारे असल्याने खऱ्या लोकांना तिकीट मिळत नाही. त्यामुळे आता आधारकार्डचे ई-व्हेरीफिकेशन असेल त्यांना ऑनलाईन तत्काळ तिकीट बुक करता येणार आहे.