AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिरज जोड मार्ग प्रकल्पाला मंजूरी, रेल्वे कनेक्टीव्ही वाढणार, प्रवाशांच्या वेळेत बचत होणार

रेल्वे मंत्रालयाने १२८.७८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन ( १.७३ किमी ) प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे रेल्वेच्या प्रवासी आणि मालमत्ता गाड्यांची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

मिरज जोड मार्ग प्रकल्पाला मंजूरी, रेल्वे कनेक्टीव्ही वाढणार, प्रवाशांच्या वेळेत बचत होणार
| Updated on: Jun 04, 2025 | 3:58 PM
Share

रेल्वे कनेक्टीव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमता वाढकरण्यासाठी रेल्वे मंत्र्यानी मोठे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वे अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या या मिरज कॉर्ड  ( Miraj Chord Line ) लाईनमुळे पश्चिम महाराष्ट्रातील मिरज जंक्शनवरील रेल्वे इंजिनांना बदलण्याची झंझट वाचणार आहे. त्यामुळे रेल्वेची परिचलन सुलभ होऊन प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.

इंटरचेंज पॉईंट मिळणार

मिरज कॉर्ड लाईन ( १.७३ किमी )  प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजूरी दिल्याने मल्टी ट्रॅकिंग, फ्लायओव्हर आणि बायपास लाईन क्षमतेत वाढ होणार आहे. तसेच मिरज जंक्शनवरील रेल्वे परिचलन  सुलभ होणार आहे. त्यामुळे मिरज-पुणे, मिरज-कोल्हापूर, मिरज-पंढरपूर आणि मिरज-लोंढा सारख्या मार्गांना जोडणारा एक प्रमुख इंटरचेंज पॉईंट उपलब्ध होणार आहे.

सध्या, कुर्डुवाडी किंवा हुब्बाली येथून येणारे आणि कोल्हापूर येथे जाणाऱ्या गाड्या, इंजिन किंवा ब्रेक व्हॅन रिव्हर्स करताना मिरज येथे १२० मिनिटे अडकून पडतात. प्रस्तावित कॉर्ड लाईनमुळे या परिचालन विलंबांना दूर केले जाईल, ज्यामुळे नेटवर्क कार्यक्षमता सुधारेल.

सध्या कुर्डुवाडू किंवा हुब्बाळी येथून येणारी आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनला १२० मिनिटांचा काळ लागतो.  कारण इंजिन किंवा ब्रेक व्हॅन बदलण्यासाठी मिरज येथे ट्रेनला मागे घेऊन डब्बे जोडण्याची वेळ जातो. त्यामुळे या ट्रेनच्या प्रवाशांचा वेळ वाया जातो. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा अपग्रेड करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि या प्रदेशात अधिक कार्यक्षम गतीने मालगाडी आणि प्रवासी रेल्वे गाड्यांचा मार्ग मोकळा होणार आहे.  मिरज ते कोल्हापूर जलद प्रवासा व्हावा यासाठी या जोड मार्गाची मागणी प्रवाशांकडून होत होती. आता दीर्घकाळापासूनची ही मागणी पूर्ण होणार आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.