AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेन्नई सुपर किंग्सने 14.2 कोटींची लावलेली बोली योग्यच ठरली! झालं असं की…

Vijay Hazare Trophy: आयपीएल 2026 स्पर्धेसाठी नुकताच मिनी लिलाव पार पडला. यात अनकॅप्ड प्लेयरसाठी चेन्नई सुपर किंग्सने 14.2 कोटी रुपये मोजले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण हा निर्णय विजय हजारे ट्रॉफीत योग्य घडताना दिसत आहे.

चेन्नई सुपर किंग्सने 14.2 कोटींची लावलेली बोली योग्यच ठरली! झालं असं की...
चेन्नई सुपर किंग्सने 14.2 कोटींची लावलेली बोली योग्यच ठरली! झालं असं की...Image Credit source: IPL
| Updated on: Dec 24, 2025 | 10:41 PM
Share

Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. खासकरून फलंदाजांनी आक्रमक खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. असं असताना या स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूने जबरदस्त कामगिरी करत चेन्नई सुपर किंग्सचा बोलीला योग्य मान दिला आहे. नुकतीच आयपीएल 2026 मिनी लिलाव प्रक्रिया पार पडली. यात चेन्नई सुपर किंग्सने अष्टपैलू प्रशांत वीरला संघात घेण्यासाठी 14.2 कोटींची बोली लावली. काहीही करून त्याला संघात घेण्याचा चेन्नई सुपर किंग्सचा अट्टाहास अनेकांना आश्चर्याचा धक्का देणार होता. पण विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात त्याने प्रशांत वीर दमदार कामगिरी केली आणि बोली योग्यच असल्याचं दाखवून दिलं. आयपीएल 2026 स्पर्धेत प्रशांत वीर चेन्नई सुपर किंग्सकडून मैदानात उतरणार आहे. त्याच्यासाठी इतकी रक्कम मोजल्याने तो प्लेइंग 11 चा भाग असेल यात काही शंका नाही.

प्रशांत वीरने पदार्पणाच्या सामन्यात कमाल केली

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या पहिल्या फेरीत उत्तर प्रदेशचा सामना हैदराबादशी झाला. या सामन्यात प्रशांत वीर उत्तर प्रदेशकडून मैदानात उतरला होता. उत्तर प्रदेशच्या वाटेला पहिल्यांदा फलंदाजी आली. त्याने 50 षटकात 5 गडी गमवून 324 धावा केल्या. या सामन्यात प्रशांत वीरला सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. पण फार काही चेंडू शिल्लक नसल्याने फलंदाजी कमाल करता आली नाही. त्याने 4 चेंडूंचा सामना केला आणि एक चौकार मारत नाबाद 7 धावा केल्या. पण धावा रोखण्यासाठी प्रशांत वीरचं योगदान महत्त्वाचं राहिलं. त्याने 10 षटकात 47 धावा दिल्या आणि तीन विकेट काढल्या.

प्रशांत वीरने एलगनी वरूण गौड, प्रज्ञान रेड्डी आणि नितीन साई यादव यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे हैदराबादचा संघ 43 षटकात 240 धावांपर्यंत मजल मारू शकला. उत्तर प्रदेशने हा सामना 84 धावांनी जिंकला. दरम्यान, प्रशांत वीरने आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीत आतापर्यंत फक्त 2 फर्स्ट क्लास आणि 9 टी20 सामने खेळले आहेत. त्याने टी20 क्रिकेटमध्ये 167.16 च्या स्ट्राईक रेटने 112 धावा केल्या आहेत. त्यात नाबाद 40 ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. तसेच 12 विकेट काढल्या आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.