AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज, 24 तास निगराणी, रेल्वे कर्मचाऱ्यांकडे सॅटेलाईट फोन

कोकण रेल्वे हा निसर्गावर मात करीत घडविलेला एक मोठा चमत्कार म्हटला जातो. उभा सह्याद्रीचा कातळ कापून या कोकण रेल्वेचे बोगदे तयार करण्यात आले आहेत. कोकण रेल्वे मान्सून काळात धावण्यासाठी सुसज्ज झाली आहे. 15 जून ते 20 ऑक्टोबर 2025 या काळात मान्सून वेळापत्रकाप्रमाणे कोकण रेल्वे धावत असते.

कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज, 24 तास निगराणी, रेल्वे कर्मचाऱ्यांकडे सॅटेलाईट फोन
| Updated on: Jun 04, 2025 | 7:02 AM
Share

कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज झाली आहे. मान्सून काळात पावसाने व्हीजीबिल्टी कमी झाल्यास मोटरमनना 40 किमी वेगाने ट्रेन चालविण्याचे आदेश दिले आहेत. यंदा देशातील काही पर्वतरांगात टनेल कोसळुन अपघात घडले आहेत. कोकण रेल्वेला गेल्या दशकभरात सुदैवाने मोठे अपघात घडलेले नाहीत. मान्सूनकाळात तासाभरात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर गाड्यांचे ऑपरेशन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच ट्रेन पुन्हा सुरु होणार आहेत.

अशी आहे मान्सूनची सज्जता

कोकणात मान्सूनकाळात काही बिकट प्रसंग आल्यास  ARMVs व्हॅन रत्नागिरी आणि वेरणे येथे सुसज्ज ठेवल्यात आल्या आहेत. मोबाईल नेटवर्कचा प्रोब्लेम मदतीसाठी अडसर ठरु नये म्हणून या ARMVs व्हॅन कर्मचाऱ्यांना त्वरीत संपर्कासाठी सॅटेलाईट फोन देण्यात आले आहेत. कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक 15 जून ते 20 ऑक्टोबर 2025 या काळात राबविण्यात येत आहे. या काळात नेहमीच्या वेळापत्रका ऐवजी मान्सून वेळापत्रकाने ट्रेन धावत असतात. सातत्याने जिओ सेफ्टी कामांच्या गुणवत्तेमुळे कोकण रेल्वेचा प्रवास निर्धोकपणे सुरु असतो. पावसाच्या या 4 महिन्याच्या कोकणातील पावसात कोकण रेल्वे सुरळीत धावण्यासाठी 636 प्रशिक्षित कर्मचारी 24 बाय 7 पेट्रोलिंग आणि ट्रॅक मॉनिटरिंगसाठी नेमलेले आहेत.

 दर एक किलोमीटवर EMC सॉकेट्स

रेल्वे ट्रॅकवर माती किंवा दरड कोसळणे, झाड कोसळणे, पाण्याची पातळी वाढणे, वादळी हवेचा आणि पावसाचा वेग वाढणे किंवा इतर कोणतीही बाधा आल्यास दर एक किलोमीटवर Emergency Communication (EMC) sockets लावण्यात आले आहेत. लोको पायलट,पेट्रोलिंग कर्मचारी,वॉचमन आणि ट्रॅक मेन्टेनन्स कर्मचाऱ्यांना आणीबाणीच्या वेळी थेट नियंत्रण कक्षात मदत मागण्याची सुविधा EMC सॉकेटमध्ये दिलेली आहे. शिवाय मोटरमन आणि गार्ड्सना स्टेशन मास्तरांशी संपर्क करण्यासाठी वॉकी टॉकी सेट असणार आहेत.

* पर्जन्य पातळी मोजण्यासाठी सेल्फ रेकॉर्डींग रेन गेज मीटर 9 स्थानकांवर ( Mangaon, Chiplun, Ratnagiri, Vilwade, Kankavali, Madgaon, Karwar, Bhatkal and Udupi ) सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.

* महत्वाच्या नदी पुलांवर फ्लड वार्निंग सिस्टीम बसविण्यात आली आहेत. यात काळी नदी ( माणगांव आणि वीर ), सावित्री नदी पुल ( वीर आणि सापे वामने ) आणि वशिष्टी नदी पुल ( चिपळूण आणि कामाठे ) येथे नदीने धोक्याची पातळी ओलांडताच अधिकाऱ्यांना आपोआप अलर्ट मिळणार आहे. * वादळी वाऱ्यांचा वेगाची पातळी मोजण्यासाठी चार महत्वाच्या रेल्वे वायाडक्ट आणि रेल्वे पुलांवर Anemometers बसविण्यात आले आहेत. पनवेल मार्ग (रत्नागिरी आणि निवसर दरम्यान), मांडवी पूल ( थिविम आणि करमाळी दरम्यान ), Zuari पूल ( करमाळी आणि वेरणा ) आणि श्रावस्ती पूल (होन्नावुर आणि मानकी दरम्यान).

Monsoon Patrolling and Surveillance

* महत्वाच्या आणि संवदेनशील स्पॉटवर प्रशिक्षित अशा 636 पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

* आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्यासाठी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि वेर्णा येथील बोगद्यांच्या सुरुवातीला बीआरएन (वॅगन) उभ्या केलेल्या आहेत.

* वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेरणा, कारवार, भटकळ, आणि उडुपी आदी महत्वाच्या 9 लोकेशन्सवर Rail Maintenance Vehicles (RMVs) सुसज्ज ठेवल्या आहेत.

* माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमाळी, कारवार आणि उडुपी या स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर दुरुस्तीसाठी टॉवर वॅगन तैनात केल्या आहेत.

* अपघात झाल्यास पंधरा मिनिटांत सुसज्ज होईल अशी Accident Relief Train (ART) वेरणा स्थानकात उभी ठेवण्यात आली आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.