रेल्वेच्या नव्या 25 टक्के वेटिंग तिकीट मर्यादेने अडचणीत वाढ, अनेक ट्रेन रिग्रेट; वेटिंग तिकीट मिळेना

येत्या काही दिवसात तुम्हाला महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश वा दक्षिण भारतातून उत्तर भारतातील प्रमुख शहरांसाठी प्रवास करायचा असेल तर वेटींगचे तिकीटही मिळणे कठीण जाणार आहे. कन्फर्म तिकीटासाठी वाट पाहावी लागू शकते. कारण रेल्वेचा नियम बदलला आहे.

रेल्वेच्या नव्या 25 टक्के वेटिंग तिकीट मर्यादेने अडचणीत वाढ, अनेक ट्रेन रिग्रेट; वेटिंग तिकीट मिळेना
| Updated on: Jul 01, 2025 | 9:43 PM

उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आहेत. गणपती सण जवळ आला आहे. तरी आतापासूनच रेल्वेची तिकीट मिळताना अडचणी येत आहेत. अनेक ट्रेनचे बुकींग करताना रिग्रेट असा संदेश येत आहे. या ट्रेनची वेटिंगची तिकीटेही मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे प्रवासी अडचणीत सापडले आहेत. उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. रेल्वेने वेटींग तिकीटांसंदर्भात एक नवा निर्णय घेतला असून त्यामुळे ही अडचण सुरु आहे.

रेल्वेने १६ जून २०२५ पासून एक नवीन नियम लागू केला आहे. त्याअंतर्गत एका ट्रेनची केवळ २५ टक्क्यांपर्यंतची तिकीटे वेटींग तिकीट म्हणून जारी केली जाणार आहेत. या नव्या नियमाचा थेट फटका असा बसला आहे की बहुतांशी ट्रेन रिग्रेट होऊ लागल्या आहेत. भारतीय रेल्वेच्या नव्या नियमानुसार रेल्वेने वेटिंग तिकीटांची संख्या एकूण उपलब्ध आसनांच्या २५ टक्क्यांपर्यंतच बुक करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच किमान वेटींग तिकीटांची संख्याही निश्चित केली आहे. म्हणजे कमी आसने असलेल्या ट्र्रेनमध्येही काही तिकीट बुक होऊ शकतील. उदा. जर एखाद्या ट्रेनमध्ये थर्ड एसी कोचमध्ये १०० आसने असतील तर केवळ २५ वेटींग तिकीट बुक केले जाऊ शकतात. याहून अधिक वेटिंगची तिकीटे जारी न करण्याचे रेल्वेने ठरवले आहे.

रेल्वेच्या या नव्या नियमांचा परिणाम लखनऊ हून दिल्ली आणि मुंबई जाणाऱ्या ट्रेनवरही झाला आहे. येथील अनेक ट्रेनना रिग्रेटस् असा संदेश येत आहे. रिग्रेट याचा अर्थ त्या ट्रेनमध्ये खास क्लास साठी कोणतीही सीट उपलब्ध नाही. आणि वेटिंग लिस्ट वा आएसीचा कोटा देखील पूर्ण झाला आहे.याचा अर्थ तुम्ही या ट्रेनमध्ये त्या तारखेपर्यंत तिकीट बुक करु शकत नाही.

लखनऊ ते दिल्ली प्रवासासाठी एसी एक्सप्रेससारख्या महत्वाच्या ट्रेनची तिकीटे एक दिवस आधी वा चार्ट बनण्याआधीपर्यंत वेटिंगची तिकीटे मिळायची. परंतू आता या ट्रेनना सात ते आठ दिवसांपासून रिग्रेट असा संदेश येत आहे.आयआरसीटीसीच्या तिकीट बुकींग एप्सवर लखनऊ मेल ५ जुलैपर्यंत रिग्रेट आहे. सर्वात खराब स्थिती थर्ड एसी इकॉनॉमी आणि थर्ड एसीची आहे. असेच हा सेकंड एसीचे देखील झाले आहेत.

 रेल्वेचा नवा नियम डोकेदुखी

जे लोक नाईलाजाने अंतिम क्षणी प्रवास करतात त्यांच्यासाठी हा रेल्वेचा नवा नियम डोकेदुखी ठरला आहे. या लोकांना आपला प्रवास रद्द करावा लागत आहे. कारण त्यांच्याकडे आता तिकीट बुकींगचा कोणताही पर्याय नाही. ट्रेनमध्ये सीट वाढवण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. अस्थायी डबे जोडण्याची मागणी देखील प्रवासी करीत आहेत. या नियमाचा फेरविचार करावा असे म्हटले जात आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांचे काय म्हणणे

हा नियम प्रतिक्षायादीला नियंत्रित करण्यासाठी आणि बुकींग प्रक्रीयेला पारदर्शी बनविण्यासाठी घेतलेला असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या नियमानुसार प्रत्येक ट्रेनच्या प्रत्येक श्रेणीच्या एकूण उपलब्ध आसनांपैकी २५ टक्के तिकीटे वेटींग म्हणून जारी केली जाणार आहेत