रेल्वेची आता डिजिटल निगराणी, लांबपल्ल्याच्या प्रत्येक डब्यात 4 सीसीटीव्ही लागणार
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डिजिटल निगराणीचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्हींचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय रेल्वेने आता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ३६० डिग्रीची निगराणी सिस्टीम लावणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षा वाढवण्यासाठी रेल्वेने लांबपल्ल्याच्या कोचमध्ये आणि इंजिनात सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय काही मार्गांवर कॅमेऱ्यांच्या यशस्वी टेस्टींग नंतर घेण्यात आला आहे. या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी १२ जुलै रोजी रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत या प्रकल्पाची आढावा बैठक घेतली.
आता प्रत्येक कोचमध्ये ४ सीसीटीव्ही
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माहीती दिली की नॉर्दन रेल्वेच्या लोको आणि कोचमध्ये सीसीटीव्हीची यशस्वी ट्रायल घेण्यात आली. त्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ७४,००० कोच आणि १५,००० इंजिनात कॅमेरे लावण्यास मंजूरी देण्यात आली. आता प्रत्येक कोचमध्ये ४ डोम-टाईप कॅमेरे लावले जातील. प्रवेशद्वारावर प्रत्येकी दोन आणि प्रत्येक इंजिनात पुढे -मागे आणि दोन्ही बाजूला असे सहा कॅमेरे लावले जातील. कॅबिनमध्ये ( फ्रंट आणि रिअर ) मध्ये एक-एक आणि दोन डेस्क माऊंट मायक्रोफोन लावले जातील.
डेटा प्रायव्हसी सुरक्षित राहणार
रेल्वेने स्पष्ट केले आहे की हे कॅमेरे केवळ सामान्य येजा करणाऱ्या मार्गावर लावले जातील. उदा. कोचच्या दरवाजा जवळ. यातून प्रवाशांचे खाजगी स्वातंत्र्य जपले जाणार असून सुरक्षा वाढली जाणार आहे.
रेल्वे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की हे कॅमेरे १०० किमी प्रतितास किंवा त्याहून अधिक वेगाने धावणाऱ्या ट्रेनमध्येही सुस्पष्ट व्हिडीओ कॅप्चर करतील आणि कमी उजेडातही ते चालतील असे असावेत.
AI चा देखील रोल असेल
STQC सर्टीफाईड आधुनिक कॅमेरे लावले जाणार आहेत. तसेच IndiaAI मिशनच्या सहकार्याने सीसीटीव्ही डेटावर AI वर आधारित विश्लेषणाची शक्यताही तपासून पाहीली जाणार आहे. ज्यामुळे संशयित हालचालींना वेगाने ओळखले. रेल्वेचे हे पाऊल न केवळ प्रवाशांच्या सुरक्षेला नवा आयाम देईलच शिवाय संघटीत गुन्हेगारी रोकण्यासाठी आणि सराईत चोरट्यांनाही ओळखण्यास मदत करणार आहे.
