मोठी बातमी! काँग्रेसने मैदान मारलं, भाजपला सर्वात मोठा धक्का, धक्कादायक निकाल

मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. 37 जिल्ह्यांपैकी तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये काँग्रेसच्या सर्वाधिक उमेदवारांचा विजय झाला आहे. तर भाजपाला केवळच चार जिल्ह्यात यश मिळवता आलं आहे.

मोठी बातमी! काँग्रेसने मैदान मारलं, भाजपला सर्वात मोठा धक्का, धक्कादायक निकाल
Rajasthan election results
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 8:15 PM

राजस्थानमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे. काँग्रेस हा पंचायत समिती निवडणुकांमध्ये राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून, भाजप दुसऱ्या क्रमाकांवर आहे. हा भाजपसाठी राजस्थानमध्ये मोठा धक्का मानला जात आहे. ग्रामीण भागांमध्ये काँग्रेसचा चांगला प्रभाव असल्याचं या निकालाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. राजस्थानच्या 37 जिल्ह्यांमध्ये पंचात समितीच्या निवडणुका पार पडल्या, त्यापैकी तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. तर चार जिल्ह्यांमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तर दुसरीकडे बांसवाडा, डूंगापूर, आणि सबूम्बर सारख्या आदिवासी बहुल भागामध्ये भारतीय आदिवासी पार्टीचा दबदबा पहायला मिळाला आहे.

पंचायत समितीच्या एकूण 7543 जागांसाठी मतदान झालं होतं. या निवडणुकीचा निकाल आज घोषीत झाला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपाला मोठा झटका दिला आहे. 7543 जागांपैकी काँग्रेसने 3558 जागांवर बाजी मारली आहे, तर भाजपाच्या वाट्याला या निवडणुकीत 2122 जागा आल्या आहेत. काँग्रेस आणि भाजपामध्ये एकूण 1436 जागांचा फरक आहे. तर 612 जागांवर अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे.

Loading...

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये देखील काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. जयपूर जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकांमध्ये 386 वार्डांपैकी 216 वार्डांमध्ये काँग्रेस उमेदवारांचा विजय झाला आहे. तर भाजपाच्या वाट्याला केवळ 87 जागा आल्या आहेत. 20 वार्डात अपक्ष उमेदवारांचा विजय झाला असून, 60 जागा आरएलपी पक्षाला मिळाल्या आहेत. इथे भाजप आणि काँग्रेसमध्ये 129 जागांचा फरक आहे.

तर दुसरीकडे जोधपूर जिल्ह्यात देखील काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. जोधपूर जिल्ह्यातील 351 जागांपैकी काँग्रेसने 135 जागांवर विजय मिळवला आहे, तर भाजपला केवळ या ठिकाणी 59 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. तर या ठिकाणी अपक्ष उमेदवारांचा 41  जागांवर विजय झाला आहे. तर भरतपूरमध्ये देखील काँग्रेसने बाजी मारली आहे. भरतपूरमध्ये काँग्रेसला 46 तर भाजपला 32 जागा मिळाल्या. 37 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यांमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला केवळ चारच जिल्ह्यांत यश मिळालं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us