अशोक गेहलोतांचं नरेंद्र मोदींनी केलं कौतूक, सचिन पायलटांनी मग गुलाम नबी आझादांचीही करुन दिली आठवण…

| Updated on: Nov 02, 2022 | 6:17 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशोक गेहलोतांचं कौतूक केलं आणि काँग्रेससा गुलाम नबी आझाद यांची आठवण आली.

अशोक गेहलोतांचं नरेंद्र मोदींनी केलं कौतूक, सचिन पायलटांनी मग गुलाम नबी आझादांचीही करुन दिली आठवण...
Follow us on

नवी दिल्लीः राजस्थानमधील बांसवाडा येथे एका कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. तर त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अशोक गेहलोत यांचेही कौतुक केले. त्यानंतर मात्र राजस्थानातील सगळे राजकारणच ढवळून निघाले. काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी गेहलोत यांची खिल्ली उडवत त्यांनी पंतप्रधानांनी गुलाम नबी आझाद यांचेही कौतुक केले होते त्याची आठवण करुन दिली.

गेहलोत यांच्या कौतुकाचे राजकीय संदर्भ जोडत सचिन पायलट म्हणाले की, राजकारणातील ही खूप मजेशीर गोष्ट आहे. कारण नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांचेही असेच कौतुक केले होते, आणि त्यानंतर काय झाले होते, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे असा टोलाही त्यानी लगावला होता. त्यामुळे नरेंद्र मोदींनी गेहलोतांचे कौतूक करणे ही गोष्ट कोणी हलक्यात घेऊ नये असंही त्यांनी सांगितले.

सचिन पायलट यांनी बंडखोरी विषयीही आपले मत मांडले. ते म्हणाले की राजस्थानमधील बंडखोर करणाऱ्या आमदारांना शिक्षा ही झालीच पाहिजे.

कारण काँग्रेस हा जुना आणि शिस्तप्रिय पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाई ही झालीच पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला.

जयपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची 25 सप्टेंबर रोजी बैठक बोलावण्यात आली होती, तर दुसरीकडे आमदार शांती धारिवाल यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी काही अशोक गेहलोत यांचे नेते जमले होते. त्या बैठकीला 60 हून अधिक आमदार उपस्थित नव्हते. त्यावेळी मोठे राजकारण करण्यात आले.

गेहलोतांच्या मुख्यमंत्रीपदारवरुन काही आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळेच त्या वेळी बंड केलेल्या नेत्यांना नोटीस पाठवून उत्तर मागवण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक करताना नरेंद्र मोदी म्हणाले होते, की, अशोक गेहलोत आणि मुख्यमंत्री म्हणून एकत्र काम केले होते.

त्यावेळच्या आमच्यासोबत असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वात ज्येष्ठ म्हणून अशोक गेहलोतच मुख्यमंत्री होते, आणि आजही मंचावर बसलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्री म्हणून तेच आहेत या शब्दात त्यांचे कौतूक करण्यात आले होते. त्यावरुन आता राजस्थानातील राजकारण प्रचंड तापले आहे.