AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पुढची 2 वर्षे त्यांना त्रास..; विजय यांच्याविषयी असं का म्हणाले रजनीकांत?

थलपती विजय यांच्याबद्दल काही मतभेद असल्याच्या चर्चांवर अखेर सुपरस्टार रजनीकांत यांनी मौन सोडलं आहे. रविवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली बाजू मांडली. त्याचप्रमाणे विजय यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आता पुढची 2 वर्षे त्यांना त्रास..; विजय यांच्याविषयी असं का म्हणाले रजनीकांत?
रजनीकांत आणि थलपती विजयImage Credit source: Instagram
| Updated on: May 17, 2026 | 1:50 PM
Share

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी सी. जोसेफ विजय यांना तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. विजय यांनी कमी वयात एनटीआर यांच्यापेक्षाही अधिक यश मिळवलंय, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं. आज (रविवार) रजनीकांत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते त्यांच्याबद्दल पसरत असलेल्या विविध अफवांवर स्पष्टपणे व्यक्त झाले. “मीडिया जेव्हा अचानक मला विजय यांच्याबद्दल विचारू लागली, तेव्हा मी हैराण झालो होतो. मी त्यांच्यासाठी खुश आहे. मला त्यांच्याविषयी ईर्षा किंवा मत्सर का वाटेल? आमच्या वयात 25 वर्षांचं अंतर आहे”, असं ते म्हणाले.

यावेळी थलपती विजय यांच्याबद्दल ते पुढे व्यक्त झाले, “लोकांना विजय यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. ते लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील अशी आशा आहे. परंतु त्याआधी दोन वर्षांपर्यंत आपण त्यांना त्रास द्यायला नको. त्यांच्या चाहत्यांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की त्यांच्या सन्मानाला कोणताही धक्का पोहोचू नये.” तमिळनाडूच्या द्रविड राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी सिनेमा आणि सोशल मीडियाने खूप मदत केल्याचं मत रजनीकांत यांनी यावेळी मांडलं.

विजय हे तमिळनाडू विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर रजनीकांत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या नसल्याच्या चर्चा पसरल्या होत्या. इतकंच नव्हे तर निवडणुकीच्या निकालानंतरही विमानतळावर रजनीकांत यांनी विजय यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं गेलं. या सर्व चर्चांवर आता रजनीकांत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जर मी या अफवांना उत्तर दिलं नाही, तर त्या खऱ्या मानल्या जातील. निवडणुकीच्या निकालानंतर मी एम. के. स्टॅलिन यांना भेटायला गेलो होतो. हा टीकेचा विषय बनला. आमची मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. एम. के. स्टॅलिन कुलथूरमधून हरले याचं मला दु:ख आहे,” असं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं.

“रजनीकांत काही नीच किंवा हलकट माणूस नाही की जो एखाद्या गोष्टीवर विनाकारण टिप्पणी करेल. मी राजकारणात नाही, मग विजयचा हेवा का बाळगावा? माझी त्याच्यावर ईर्षा का असेल? विजय आणि माझ्यात 25 वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल मत्सर वाटण्याचं काहीच कारण नाही”, असं स्पष्ट उत्तर रजनीकांत यांनी ट्रोल करणाऱ्यांना दिलं आहे.

Follow Us
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा