सचिन, लतादीदींना मतं मांडण्याचा अधिकार नाही का?; आठवले आघाडी सरकारवर भडकले!

| Updated on: Feb 09, 2021 | 3:01 PM

पॉप सिंगर रिहाना हिच्या ट्विटला उत्तर देताना गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी सडेतोड उत्तर दिलं. (ramdas athawale slams maha vikas aghadi over celebrities tweet enquiry)

सचिन, लतादीदींना मतं मांडण्याचा अधिकार नाही का?; आठवले आघाडी सरकारवर भडकले!
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री
Follow us on

नवी दिल्ली: पॉप सिंगर रिहाना हिच्या ट्विटला उत्तर देताना गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी सडेतोड उत्तर दिलं. त्याचा अभिमान वाटायचा सोडून महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने या सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे, असं सांगतानाच सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार नाही काय? असा सवाल रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. (ramdas athawale slams maha vikas aghadi over celebrities tweet enquiry)

रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त केली. सरकार च्या एखाद्या निर्णयाला; नवीन कायद्याला विरोध करणे जसा लोकशाहीत अधिकार आहे तसाच त्या निर्णयाला आणि नवीन कायद्याला पाठिंबा देण्याचा; समर्थन करण्याचाही अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने केंद्र सरकार च्या एखाद्या कायद्याचे समर्थन करणारे विचार मांडले म्हणून त्याची राज्य सरकार ने चौकशी करावी हे लोकशाहीच्या चौकटीत बसणारे नाही. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर हे भारतरत्न या सर्वोच्च किताबाचे मानकरी आहेत. त्यांना स्वतःचे विचार आहेत. त्यांनी शेतकरी आंदोलनावरून परकीय कलाकारांना सुनावले हे योग्य झाले. भारतरत्न लाभलेल्या महनीय व्यक्तींच्या मतांचा आपण सन्मान केला पाहिजे, मात्र महाविकास आघाडी सरकारने या महनीय व्यक्तींच्या ट्विट केलेल्या मतांची चौकशी करण्याचा निर्णय घेणे म्हणजे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे. त्यांना आपली मते मांडण्याचा अधिकार नाही का?. असा सवाल त्यांनी केला आहे.

भूमिका योग्यच

शेतकऱ्यांचं आंदोलन हा प्रश्न आपल्या देशाचा अंतर्गत विषय आहे. त्यात परकीय लोकांनी नाक खुपसने योग्य नाही. तशी प्रखर राष्ट्र प्रेमाची भूमिका भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी घेतली. ती भूमिका स्वागतार्ह आहे. मात्र या भारतरत्नांच्या ट्वि ची चौकशी करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय अत्यंत निषेधार्ह, असं त्यांनी सांगितलं.

आंदोलन थांबले पाहिजे

दिल्लीच्या सीमांवर चालू असलेले शेतकऱ्यांचे जन आंदोलन हे कुठे तरी थांबले पाहिजे. आम्हीही आंदोलने केली. मात्र शेतकरी आंदोलन हे का थांबविले जात नाही. शेतकऱ्यांचा आम्ही सन्मान करतो. शेतकऱ्यांचे हित जोपासणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. शेतकऱ्यांनी ज्या नवीन कायद्यांना विरोध केला त्या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्या नुसार केंद्र सरकारने स्थागती दिली आहे. मग का आंदोलन चालू आहे?, असा सवालही त्यांनी केला.

 

आंदोलन थांबवून चर्चा करा

शेतकरी संघटनांशी अनेक वेळा केंद्र सरकारने चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. कायद्यात हवी ती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या आंदोलनाला परवानगी दिली. दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीला परवानगी दिली. मात्र आंदोलन थांबविण्याऐवजी शेतकरी नेते आंदोलन चिघळत ठेवत आहेत. पंतप्रधानांनी संसदेत आश्वासन दिले आहे की, MSPहोती, आहे MSP आहे आणि MSP राहील. एमएसपी जाणार नाही. त्यामुळे कृषी कायद्यांविरुद्धचे आंदोलन थांबवून शेतकऱ्यांनी चर्चेतून मार्ग काढला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. (ramdas athawale slams maha vikas aghadi over celebrities tweet enquiry)

 

संबंधित बातम्या:

‘आंदोलनजीवी’ कोण?; छगन भुजबळांनी भाजपला सुनावले

VIDEO: राऊतांनी राणेंचं नॉन मॅट्रीकपण काढलं, निलेश राणे म्हणतात, चप्पल चोर, जिथे दिसेल तिथे फटकावण्याची भाषा!

अमित शाहांना एका वर्षानंतर शुद्ध आल्याचा आनंद; गुलाबराव पाटलंचा पलटवार

(ramdas athawale slams maha vikas aghadi over celebrities tweet enquiry)