VIDEO: राऊतांनी राणेंचं नॉन मॅट्रीकपण काढलं, निलेश राणे म्हणतात, चप्पल चोर, जिथे दिसेल तिथे फटकावण्याची भाषा!

विनायक राऊत ही खासदारपदाच्या लायकीची व्यक्ती नाही. संसदेत काय बोलायचे हेदेखील त्यांना कळत नाही. | Nilesh Rane

VIDEO: राऊतांनी राणेंचं नॉन मॅट्रीकपण काढलं, निलेश राणे म्हणतात, चप्पल चोर, जिथे दिसेल तिथे फटकावण्याची भाषा!
विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि 'थापे'बाज आहे, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी केली.

मुंबई: अमित शाह यांच्या कोकण दौऱ्यानंतर भाजपला प्रत्युत्तर देण्यात आघाडीवर असलेले शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि ‘थापे’बाज आहे, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी केली. (Nilesh Rane slams Shivsena MP Vinayak Raut)

देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे शिवसेना-भाजपची युती तुटली. तसेच अमित शाह हे विश्वासघातकी व्यक्ती आहेत, असे विनायक राऊत यांनी म्हटले होते. या टीकेला निलेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे. या व्हिडीओत निलेश राणे यांनी विनायक राऊत यांचा अक्षरश: शेलक्या शब्दांत उद्धार केला आहे.

विनायक राऊत ही खासदारपदाच्या लायकीची व्यक्ती नाही. संसदेत काय बोलायचे हेदेखील त्यांना कळत नाही. केवळ लाट होती म्हणून ते कोकणातून निवडून आले. त्यांच्यात हिंमत असेल तर या क्षणाला खासदाराकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवावी. मग त्यांना किती मतं पडतात, हे पाहूच. विनायक राऊत यांच्यात तेवढी हिंमतही नाही. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांचा बंदोबस्त करुन राऊतांना कोकणातून हद्दपार करू, अशी गर्जना निलेश राणे यांनी केली.

‘भाषा बदला अन्यथा जिथे दिसाल तिथे फटकावीन’

काही दिवसांपूर्वीच जिल्हा नियोजन बैठकीत विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यानंतरही विनायक राऊत सातत्याने राणे यांच्या टीकेला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत आहेत. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी विनायक राऊत यांना इशारा दिला. तुम्ही भाषा बदलली नाहीत तर जिथे दिसाल तिथे फटकावीन, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला.

राणेंनी उद्धव ठाकरेंना एकदा नव्हे तीनदा फोन केला, राऊतांचा दावा

खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी एकदा नव्हे, तर तीन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना फोन केला होता. तीन-तीन वेळा फोन केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून राणेंची विचारपूस केली आणि काय काम आहे ते विचारुन घेतलं. नारायण राणे गृहमंत्री अमित शाहांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिव्या द्यायचं काम करतात, राणेंचा तो परीपाट आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी घणाघाती टीका केली होती.

संबंधित बातम्या:

सिंधुदुर्गातील मेडिकल कॉलेजसंदर्भातील परवानग्यांसाठी भाजप नेते नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन

कोकणात दोन खासदारांचा राडा, मंत्र्यांची मध्यस्थी

शाह विश्वासघातकी, फडणवीसांच्या हट्टामुळे युती तुटल्याचं भाजपच्या दिल्लीश्वरांनाही मान्य : विनायक राऊत

(Nilesh Rane slams Shivsena MP Vinayak Raut)

Published On - 2:26 pm, Tue, 9 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI