AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलींना वेश्या म्हणणाऱ्या अनिरुद्धाचार्यांवर रामदेव बाबा संतापले, म्हणाले, ‘आपण त्यांना गुरु…’

अनिरुद्धाचार्य यांनी मुलींना वेश्या असं म्हणात वादग्रस्त विधान केले आहे. आता योगगुरू रामदेव बाबा यांनी अनिरुद्धाचार्य यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मुलींना वेश्या म्हणणाऱ्या अनिरुद्धाचार्यांवर रामदेव बाबा संतापले, म्हणाले, 'आपण त्यांना गुरु...'
Ram dev Baba
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 27, 2025 | 7:38 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून कथावाचक अनिरुद्धाचार्य आपल्या विधानांमुळे चर्चेत आहेत. अनिरुद्धाचार्य यांनी मुलींना वेश्या असं म्हणात वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे आता अनिरुद्धाचार्य यांच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. अशातच आता योगगुरू रामदेव बाबा यांनी अनिरुद्धाचार्य यांच्यावर सडकून टीका केली आहे. अशा लोकांना गुरु म्हणणे थांबवलं पाहिजे असं रामदेव बाबा म्हणाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रामदेव बाबा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कथावाचक अनिरुद्धाचार्य यांच्याविरोधात संताप व्यक्त केला होता. बाबा रामदेव म्हणाले की, ‘सनातन धर्माचे गुरु किंवा संन्यासी ते आहेत ज्यांनी देशासाठी उद्योग, आरोग्य, शिक्षण यामध्ये योगदान दिले आहे. ज्याचे भारताला भारत बनवण्यात कोणतेही योगदान नाही, जो मूर्खपणे बोलत आहे तो सनातन धर्माचा गुरु असू शकत नाही. आपण अशा लोकांना गुरु म्हणवून घेणे बंद करायला पाहिजे.’

पुढे बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, ‘जीवनात चारित्र्य, पवित्रता आणि पुरुषत्व असले पाहिजे. मात्र सनातन धर्माचे अनेक गुरु लोक उपदेशाच्या नावाखाली फसवणूक करतात. धर्मग्रंथातील एका श्लोकावर बोलताना बाब म्हणाले की, उपदेश करण्यात ना तथ्य आहे, ना विज्ञान आहे ना सत्य आहे, त्यांनी आता अशा गोष्टी बोलणे बंद करायला हवे.

अश्लील गोष्टींबद्दल बोलणे म्हणजे…

अनिरुद्धाचार्य यांच्या मुलींच्या चारित्र्याबद्दल विधानावर बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, ‘स्त्री असो वा पुरुष असो प्रत्येकाचे आचरण चांगले असले पाहिजे. कोणत्याही वर्गाला लक्ष्य करणे आणि अश्लील गोष्टींबद्दल बोलणे हे स्वतःच एक अश्लीलता आहे. कोणताही सुसंस्कृत माणूस अशाप्रकारते विधान करु शकत नाही. सामान्य लोकांनीही अश्लील गोष्टींबद्दल बोलू नये. कोणावरही टीका करू नये. एखाद्याविषयी वाईट बोलणे खूप चुकीचे आहे.’

अमेरिकेच्या टॅरिफवरही भाष्य

अमेरिकेने भारतावर लादलेल्या करावर बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, देशातील उत्पादन वाढवण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे. दुसऱ्या देशातून वस्तू आपल्या देशात येऊ नये यासाठी त्यांनी कर लादला आहे. मात्र अमेरिकेला आयातीशिवाय पर्याय नाही. कारण अमेरिकेत कामरांचा पगार आणि कच्चा माल महाग आहे, त्यामुळे अमेरिका आपले उत्पादन वाढवू शकत नाही.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा