
योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांची पतंजली आयुर्वेद कंपनी ही नेहमीच लोकांचे आरोग्य लक्षात घेऊन वेगवेगळी उत्पादनं बाजारात आणते. वॉटर बेस्ड ड्रिंक्स, सोडा बेस्ड ड्रिंक्स, कॅफीन बेस्ड ड्रिक्स यांच्यातून शरीराची होणारी हानी लक्षात घेऊन नैसर्गिक आणि पारंपरिक पेय बाजारात आणले आहेत. यात गुलाब सरबत यासारख्या थंड पेयांचाही समावेश आहे. यासोबतच पतंजली आयुर्वेदने मँगो बेस्ड फ्रुट ड्रिंक, बेलाचे सरबत, खस सरबत यांचाही समावेश आहे.
या नव्या पेयांच्या माध्यमातून पतंजली आयुर्वेद ही कंपनी लोकांच्या आरोग्यासाठी तसेच राष्ट्राच्या सेवेचे मूल्य समोर ठेवून काम करत आहेत. आपल्या या नव्या पेयांबाबत पतंजलीने सविस्तर माहिती दिली आहे. गुलाब सरबत तयार करण्यासाठी आम्ही पारंपरिक पद्धतीचा वापर केला आहे. सोबतच हे सरबत तयार करताना नैसर्गिक प्रक्रियेला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. याच कारणामुळे या गुलाबाच्या सरबतमध्ये नैसर्गिक गुण कायम राहण्यास मदत होते, असे पतंजलीने सांगितले आहे. गुलाब सरबत तयार करण्यासाठी पतंजली थेट शेतकऱ्यांकडून गुलाब खरेदी करते. सरबताची शुद्धता कायम ठेवण्यासाठी पतंजलीकडून तसा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्तराखंडमधील पतंजली फूड फार्ममध्ये औषधी वनस्पतींची ऑरगॅनिक फार्मिंग केली जाते. लोकांसाठी लाभदायक आणि स्वास्थ्यपूर्ण उत्पादन तयार करण्यासाठी या औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. पतंजली आयुर्वेदकडून बेल आणि खसचे सरबत तयार करण्यासाठीदेखील नैसर्गिक पद्धतींचाच वापर केला जातो.
पतंजलीकडून फक्त आरोग्याच्या सेवेसोबतच राष्ट्राचीही सेवा कशी होईल, यासाठी प्रयत्न केला जातो. उत्पादनांच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांचा बराच भाग पतंजली समाजाच्या कल्यासाठी वापरते. पतंजली आयुर्वेद गुलाब सरबतासह अन्य उत्पादनांतून जी कमाई होते त्यातील काही भाग ग्रामीण आणि आदिवासी भागातीली गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जातो. त्यामुळेच पतंजली आरोग्यबरोबरच राष्ट्र सेवेच्या कार्यातही आपले योगदान देते.