पतंजली बनवणार पश्चिम उत्तर प्रदेशला एक्स्पोर्ट हब, जाणून घ्या सरकारचा नेमका प्लॅन काय?

यिडाचे विशेष कार्यकारी अधिकारी शैलेंद्र भाटिया यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या माहितीनुसार यिडाने पतंजलीसोबत या प्रस्तावावर चर्चा केलेली आहे. पतंजलीने मात्र या प्रस्तावावर अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.

पतंजली बनवणार पश्चिम उत्तर प्रदेशला एक्स्पोर्ट हब, जाणून घ्या सरकारचा नेमका प्लॅन काय?
patanjali
| Updated on: Oct 22, 2025 | 8:47 PM

Patanjali : उत्तर प्रदेश सरकार जेवर विमानतळाच्या मदतीने पश्चिम उत्तर प्रदेशच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. उत्तर प्रदेश सरकार यमुना एक्स्प्रेस वे म्हणजेच जेवर विमनतळाजवळ एक फुड पार्क तयार करण्याच्या विचारात आहे. पतंजली ही कंपनी सरकारला या मोहिमेत खूप मदत करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार यमुना एक्स्प्रेस वे औद्योगिक विकास महामंडळाने पतंजली आणि इनोवा फुड पार्क, कोलार यांच्यात एक करार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या कराराच्या मदतीने जेवर विमानतळाजवळ एक कृषी एक्स्पोर्ट सेंटरची स्थापना केली जाणार आहे. यमुना एक्स्प्रेस वे औद्योगिक विकास महामंडळाने (यिडा) या भागात पतंजलीला सेक्टर 24 ए मध्ये काही जमीन दिलेली आहे. यातील साधारण 50 एकर जमीन पतंजलीने इनोवाला इनोवाला फुड पार्क उभारण्यासाठी सब-लीजने द्यावी, असे या प्रस्तावात म्हणण्यात आलेले आहे.

20 टक्के जमीन सब-लीजने देऊ शकते

यिडाचे विशेष कार्यकारी अधिकारी शैलेंद्र भाटिया यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या माहितीनुसार यिडाने पतंजलीसोबत या प्रस्तावावर चर्चा केलेली आहे. पतंजलीने मात्र या प्रस्तावावर अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. पतंजलीकडे 24 ए सेक्टरमध्ये मोठा जमिनीचा पट्टा आहे. नियमानुसार पतंजली यातील साधारण 20 टक्के जमीन सब-लीजने देऊ शकते. पतंजलीकडे तसे अधिकार आहेत. पतंजलीकडे असलेली ही जमीन फारच मोक्याच्या ठिकाणी आहे. पतंजली यातील काही जमीन फुड पार्कसाठी देण्यास तयार झाल्यास त्याचा पतंजलीच्या प्रकल्पांनाही फायदा होऊ शकतो.

फुड पार्कमुळे नेमकं काय काय होणार?

याबाबतचा प्रस्ताव अगोदरच उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाने मंजूर केलेला आहे. या प्रस्तावित फूड पार्कच्या माध्यमातून कृषी उत्पादनांचे टेस्टिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग यांच्यासाठी एक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. हा फुड पार्क अस्तित्त्वात आल्यास तो एअरपोर्टच्या कार्गो टर्मिनलपासून फक्त 10 किमी अंतरावर असेल. त्यामुळे शेतीविषयक उत्पादने मध्य पूर्वेत, युरोप, रशिया तसेच इतर आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करणे सोपे होईल. या फुड पार्कमुळे ट्रान्सिट टाईम आणि लॉजिस्टिक कॉस्टमध्येही घट होईल.

2017 साली पतंजलीला मिळाली होती जमीन

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने 2017 साली सेक्टर 27 मध्ये पतंजली ग्रुपला फुड आणि हर्बल पार्क विकसित करण्यासाठी 430 एकर जमीन दिली होती. यातील 300 एकर जमी ही पतंजली फुड अँड हर्बल पार्क नोएडा प्रायव्हेट लिमिटेडला तर उरलेली 130 एकर जमीन पतंजली आयुर्वेद लिमिटेड या कंपनीला दिली होती. त्यामुळे पतंजलीने सहमती दाखवली तर यातील 50 एकर जमिनीच्या सब-लीजमुळे इनोवाला या भागात कृषी निर्यात केंद्र स्थापन करण्यास मदद होईल. यामुळे पश्चिम उत्तर प्रदेशला एक प्रमुख कृषी निर्यात क्षेत्र म्हणून नावारुपाला येण्यास मदत होईल.