AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Watch Video | औकातीत राहा… रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांची महापौर आणि खासदारासोबत बाचाबाची

भाजपच्या आमदार रिवाबा जडेजा भाजपच्या खासदार आणि महापौर यांना भिडल्या. तिघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.

Watch Video | औकातीत राहा... रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांची महापौर आणि खासदारासोबत बाचाबाची
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 17, 2023 | 4:45 PM
Share

Rivaba Jadeja Fight | भाजपच्या आमदार आणि भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांची जामनगरच्या महापौर आणि त्यांच्याच पक्षाचे खासदार यांच्यासोबत शाब्दिक बाचाबाची झाली. या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जामनेरमधील लखोटा तलावावर जामनगर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या कार्यक्रमादरम्यान हा वाद पाहायला मिळाला. रिवाबा यांनी महापौर आणि खासदारांना फटकारले.

भाजपच्या खासदार पूनमबेन हेमतभाई मॅडम यांनी दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि महापौरांनी नाराज झालेल्या पक्षाच्या आमदाराला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा रिवाबा त्यांच्यावरच संतापल्या.

रिवाबा यांना राग अनावर ?

जामनेर शहरातील लखोटा तलावावर जामनगर महापालिकेतर्फे ‘मारी माती-मारो देश’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भाजप आमदार रिवाबा जडेजा आणि महापौर बिनाबेन कोठारी यांच्यात वादावादी झाली. जेव्हा महापौरांनी रिवाबाला तिच्याशी शिष्टाचाराने बोलण्यास सांगितले तेव्हा रिवाबाने तिला “तिच्या मर्यादेत” राहण्यास सांगितले.

दरम्यान, तेथे उपस्थित असलेल्या खासदार पूनम मॅडम यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, रिवाबा यांनीही ही आग आपल्याकडूनच लागली आहे, त्यामुळे ती विझवण्याचा प्रयत्न करू नका, असेही म्हटले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?