इंधनावरील कर कमी करा, RBI गव्हर्नर शक्तीकांता दास यांचा सरकारला सल्ला

इंधनावरील दर कमी करा, असा सल्ला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास (RBI Governor Shaktikanta Das यांनी सरकारला दिला आहे.

इंधनावरील कर कमी करा, RBI गव्हर्नर शक्तीकांता दास यांचा सरकारला सल्ला
RBI गव्हर्नर शक्तीकांता दास
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 7:22 AM

नवी दिल्ली : इंधनावरील दर कमी करा, असा सल्ला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास (RBI Governor Shaktikanta Das यांनी सरकारला दिला आहे. दररोजच्या इंधन दरवाढीवरुन संकटात सापडलेल्या नागरिकांना दिलासा देण्याकरिता इंधनावरील कर कमी करण्याचा सल्ला त्यांनी सरकारला दिलाय. (RBI Governor Shaktikanta Das Suggest reducing Indirect tax on Fuel)

इंधनाचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. इंधन भाववाढीच्या बातम्याही आता रोजच्या ठरलेल्या. अशा परिस्थितीत दररोज वाढलेल्या महागाईने सर्वसामान्याचं कंबरडं मोडलंय. अशावेळी इंधनाचे दर कमी केले जावे, अशी मागणी सर्वसामान्य लोक करत आहेत.

पेट्रोल आणि डिझेलवरच्या अप्रत्यक्ष करात कपात करा

इंधनाच्या वाढत्या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरच्या अप्रत्यक्ष करात कपात करण्याची गरज निर्माण झाली आहे, असं शक्तीकांता दास म्हणाले. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत त्यांनी आपलं मत मांडलंय.

केंद्र आणि राज्य सरकारांनी संयुक्तरित्या करकपात करण्याची गरज

दिवसेंदिवस होणाऱ्या इंधन दरवाढीवरुन महागाई देखील वाढत आहे. डिसेंबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित खाद्य आणि इंधनाचा महागाईचा दर 5.5 टक्के राहिला. इंधन दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी संयुक्तरित्या करकपात करण्याची गरज असल्याचं शक्तीकांता दास म्हणाले.

दररोजची इंधन दरवाढ

दोन दिवसांच्या छोट्याशा विश्रामानंतर पुन्हा इंधन दरवाढ झाली. पेट्रोल डिझेलच्या दरात प्रत्येकी पैशांची वाढ झालीय. या दरवाढीने पेट्रोल चक्क 97 रुपये क्रॉस झालं तर डिझेलही जवळपास 88 रुपये लीटरवर गेलं आहे.

….तर महागाई अटळ!

डिसेंबरमध्ये घाऊक महागाईचा दर 5.5 टक्क्यांवर पोहोचला होता. त्यात आणखी भर पडून महागाई आणखी वाढेल. तसंच वस्तू आणि सेवांचे तर वाढतील, अशा इशारादेखील आरबीआयने दिला आहे.

(RBI Governor Shaktikanta Das Suggest reducing Indirect tax on Fuel)

हे ही वाचा :

महाराष्ट्राचे मन खंबीर, इरादे पक्के, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाही, सामनातून टीका

नियम सर्वांना सारखेच, पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.