
मनरेगाच्या नाव बदलण्यावरून सुरू असलेला वाद काहीसा थांबलाही नाही की आता एका सीपीआय खासदाराने सरकारवर आणखी एक आरोप केला आहे. राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास यांनी केंद्र सरकार भारतीय चलनी नोटांमधून महात्मा गांधीजींचा फोटो काढून टाकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर त्यांनी दावा केला की सुरूवातीपासूनच यासाठी एक उच्चस्तरीय बैठका ही झाल्या आहेत.आणि त्या जागी भारताचा वारसा असलेले चिन्हे लावण्यासाठी चर्चा सुरू आहे. असंही सोमवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले आहेत.
मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अशा कोणत्याही विचाराला वारंवार नकार दिला आहे. तरी खासदाराचा हा आरोप आहे. तर यावेळी माध्यमांशी बोलताना ब्रिटास म्हणाले की अधिकृत नकार असूनही चर्चेचा पहिला टप्पा आधीच उच्च पातळीवर झाला आहे. हे आता फक्त अनुमान राहिलेले नाही. आपल्या चलनातून गांधीजींचा फोटो काढून टाकणे हा देशाच्या प्रतीकांना पुन्हा लिहिण्याच्या मोठ्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
1996 मध्ये महात्मा गांधी सीरिजच्या बँक नोटा सुरू झाल्यावरही सर्व नोटांवर महात्मा गांधींजीचा फोटो कायमचा छापण्यात आला. 2022 मध्ये, आरबीआयने भारतीय चलनातून गांधीजींची प्रतिमा काढून टाकली जाणार नाही असे वृत्त स्पष्टपणे फेटाळून लावले.
एका अधिकृत निवेदनात केंद्रीय बँकेने म्हटले आहे की गांधीजींच्या प्रतिमेऐवजी इतर कोणत्याही व्यक्तिमत्त्वाची प्रतिमा वापरण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. मीडिया रिपोर्ट्सनंतर असा दावा करण्यात आला की आरबीआय आणि अर्थ मंत्रालय काही नोटांमध्ये रवींद्रनाथ टागोर आणि ए.पी.जे. अब्दुल कलाम सारख्या व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमा वापरण्याचा विचार करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मनरेगाच्या VB-G RAM G ग्रामीण रोजगार आणि उपजीविका अभियान (ग्रामीण) जागी विधेयक मंजूर केला आहे. त्यात हे विधायक पुणपणे नवीन आहे असे सरकारच म्हणणे आहे. तर पुन्हा एकदा सरकारने हे विधेयक मंजूर करत महात्मा गांधीजींचे नाव काढून टाकण्यासाठी हा कायदा केला आहे. असा दावा विरोधकांनी केला आहे.
या व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या टी पार्टीत काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीवर ब्रिटास यांनी टीका केली आणि म्हटले की, देशातील गरिबांवर परिणाम करणारे रोजगार हमी विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधानांच्या स्वागत समारंभात प्रियंका गांधी यांची उपस्थिती लोकशाहीवरील कलंक आहे.
काँग्रेस संसदीय पक्षात नेता किंवा मुख्य प्रतोद असे कोणतेही अधिकृत पद नसलेल्या प्रियांका गांधी या स्वागत समारंभाला का उपस्थित राहिल्या असा प्रश्न ब्रिटास यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की, जनविरोधी कायदे करणाऱ्या सरकारविरुद्ध मवाळ भूमिका घेतल्याने विरोधी पक्षाची विश्वासार्हता कमी होईल. महात्मा गांधींची प्रतिमा चलनातून काढून टाकल्यानंतरही प्रियांका गांधी आणि त्यांचे मित्र अशा स्वागत समारंभांना उपस्थित राहू शकतात, असा टोमणा त्यांनी लगावला.