पेंट, शाईतील विष कफ सिरपमध्ये? लिमिटपेक्षाही अधिक मात्रेत; का?, धक्कादायक रिपोर्ट

Coldrif row : कफ सिरपमुळे लहान मुलांच्या होणाऱ्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली. काही राज्यामध्ये थेट यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आता कफ सिरपबद्दल धक्कादायक आणि हैराण करणारी माहिती पुढे येतान दिसत आहे.

पेंट, शाईतील विष कफ सिरपमध्ये? लिमिटपेक्षाही अधिक मात्रेत; का?, धक्कादायक रिपोर्ट
Cough syrup
| Updated on: Oct 06, 2025 | 3:47 PM

कफ सिरप पिल्ल्याने मुलांचे मृत्यू होत असल्याचे पुढे आल्याने एकच खळबळ उडाली. आतापर्यंत तब्बल 16 मुलांचे मृत्यू कफ सिरप पिल्याने झाली. तामिळनाडू ड्रग कंट्रोल विभागाच्या अहवालात असे म्हटले आहे की, मुलांना देण्यात येणाऱ्या कोल्ड सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल होते. अनेक राज्यांनी थेट निर्णय घेत आपल्या राज्यात कफ सिरपवर थेट बंदी घातली. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये कफ सिरपवर पूर्णपणे बंदी आहे. रिपोर्टनुसार, मध्य प्रदेश ड्रग कंट्रोलरने केलेल्या तपासणीत असेही आढळून आले आहे की, सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल (DEG) 48 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोलीची परवानगी फक्त 0.1 टक्के आहे.

कफ सिरपमध्ये मिसळलेला ब्रेक फ्लुइड्स, पेंट्स, शाई इत्यादींच्या निर्मितीमध्ये वापरला जातो. यापूर्वी अनेकदा जागतिक आरोग्य संघटनेने देखील वारंवार इशारा दिला आहे की, औषधांमध्ये त्याचा वापर आरोग्यासाठी खूप जास्त धोकादायक आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेचा कफ सिरपबद्दलचा दावा खरा होताना दिसतोय. देशातील तब्बल 16 मुले या कफ सिरपमुळे मृत्यूमुखी पडली आहेत.

डायथिलीन ग्लायकॉल हे रंगहीन आणि गंधहीन अल्कोहोलिक आहे. ते रेझिन, प्लास्टिसायझर्स, ब्रेक फ्लुइड्स, लोशन, क्रीम, डिओडोरंट्स इत्यादींमध्ये वापरले जाते. ओलावा टिकवण्यासाठी त्याचा वापर होतो. अनुप्रयोगांमध्ये विरघळणारे पदार्थ म्हणून वापरले जाते. थोडक्यात काय तर हे एखाद्या विषाप्रमाणे काम करते आणि याला खाद्यपदार्थांपासून दूर ठेवले गेले पाहिजे. हेच कफ सिरपमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातंय.

प्रति किलोग्रॅम फक्त 1 ते 2 मिलीलीटर इथिलीन ग्लायकॉल मानवांसाठी घातक ठरू शकते. भारतात काही मोजक्या औषधांमध्ये याला फक्त आणि फक्त 0.01 टक्के वापरण्याची परवानगी आहे. काही देशांमध्ये तर याच्यावर बंदी असून कोणत्याही औषधांमध्ये हे वापरले जाऊ शकत नाही. कंपन्यांनी त्यांच्या पैसा वाचवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि थेट यामुळे लेकरांची जीव जात आहेत.

डायथिलीन ग्लायकॉल हा एक अत्यंत विषारी पदार्थ आहे. ज्याचा सर्वाधिक परिणाम थेट आपल्या किडनीवर होतो. जे मूत्रपिंडाच्या पेशी नष्ट करतात. मुळात म्हणजे असे अजिबात नाही की, डायथिलीन ग्लायकॉल औषधांमध्ये टाकलेच पाहिजे. त्याच्या मदतीशिवाय देखील औषध तयार होते. पण कंपन्या आपल्या स्वार्थासाठी आणि पैसा वाचव्यासाठी त्याचा सर्रासपणे वापर करतात. आता अशा कंपन्यांवर सरकार काय कारवाई करते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.