‘रिपब्लिक भारत टीव्ही’चे अँकर विकास शर्मांचं निधन, काही दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त

| Updated on: Feb 05, 2021 | 7:33 AM

अर्णव गोस्वामी यांच्या रिपब्लिक भारत टीव्हीचे अँकर विकास शर्मा (Vikas Sharma) यांचं गुरुवारी निधन झालं आहे. Republic Bharat anchor Vikas Sharma

‘रिपब्लिक भारत टीव्ही’चे अँकर विकास शर्मांचं निधन, काही दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त
विकास शर्मा
Follow us on

नवी दिल्ली: अर्णव गोस्वामी यांच्या रिपब्लिक भारत टीव्हीचे अँकर विकास शर्मा (Vikas Sharma) यांचं गुरुवारी निधन झालं आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते आजारी होते. गुरुवारी रात्री उत्तर प्रदेशातील नोएडामधील एका रुग्णालयात त्यांचं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार विकास शर्मांना ताप आला होता. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. मात्र, त्यातून बरे झाले होते. (Republic Bharat anchor Vikas Sharma passes away)

विकास शर्मा रिपब्लिक भारत टीव्हीवर रात्री 9 वाजताचा ‘ये भारत की बात है’ हा कार्यक्रम घ्यायचे. विकास शर्मा यांच्या निधनावर रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. विकास शर्मा यांच्या निधनानं रिपब्लिक नेटवर्कचं मोठं नुकसान झाल्याची भावना अर्णव गोस्वामी यांनी व्यक्त केलीय. विकास शर्मा यांची अँकरिंग करण्याची एक वेगळी शैली होती मात्र ते या जगात नाहीत यावर विश्वास बसत नसल्याचं अर्णव गोस्वामी म्हणाले.

मान्यवरांकडून दु:ख व्यक्त

अर्णव गोस्वामी यांनी विकास शर्मा जमिनीवर राहून अँकरिंग करत होते. त्यासह त्यांच्याकडे गुणवत्ता असल्याचं म्हटलं. विकास शर्मांच्या निधनावर चित्रपट निर्माता अशोक पंडित, आमदार अभिजित सिंह सांगा, भाजप आमदार दिनेश चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. विकास शर्मा कानपूर येथे वास्तव्यास होते. नोएडाच्या कैलाश रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्याच रुग्णालयात त्यांचं निधन झालं. विकास शर्मा यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. विकास शर्मा 35 वर्षांचे होते.

कानपूरमध्ये अंत्यसंस्कार

विकास शर्मा यांच्यावर कानपूरमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या: 

Arnab Goswami Arrested LIVE | सोनिया सेना आणखी किती गळे दाबणार, अर्णव गोस्वामींच्या अटकेवरुन कंगनाचा घणाघात

अर्णव गोस्वामींना मोठा झटका, जवळपास 20 लाखाचा दंड

TRP scam | मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, रिपब्लिक चॅनेलच्या सीईओंना अटक

TRP Scam | फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक केलेले ‘ते’ 13 जण कोण?

(Republic Bharat anchor Vikas Sharma passes away)