
77 वा प्रजासत्ताक दिन अवघ्या चार दिवसांवर आहे. जोरदार तयारी केली जात आहे. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाची खास तयारी सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी सहा संशयित दहशतवाद्यांची फोटो असलेले पोस्टर जारी केले आहे. या पोस्टमध्ये पहिल्यांदाच दिल्लीतील एका दहशतवाद्याचा फोटो आहे. प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू असली तरीही सुरक्षा यंत्रणांचे प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष आहे. छोट्या छोट्या हालचालींवर विविध यंत्रणांचे लक्ष आहे. दिल्लीसह, मुंबई, पुणे, कोलकाता, हैद्राबाद, बंगलूर, अमृतसर या शहरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. सहा संशयित दहशतवाद्यांचे फोटो असलेले पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले, त्यात मोहम्मद रेहान आहे, जो अलकायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट’ (AQIS) या संघटनेशी संबंधित आहे. दहशतवादी मोहम्मद रेहान याचा शोध गुप्तचर यंत्रणा बऱ्याच काळापासून घेत आहेत.
कोणत्याही परिस्थितीमध्ये दहशतवादी मोहम्मद रेहान यंत्रणांना हवा आहे. भारतात काही मोठ्या दहशतवादी कारवाई तो करू शकतो, असा संशय आहे. शिवाय मागील काही दिवसांपासून तो गायब आहे. 26 जानेवारी रोजी 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर, अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक गुप्तचर संस्थांकडून माहिती गोळा करून बारीक लक्ष ठेवले जात आहे.
हेच नाही तर संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे जागोजागी लावण्यात आली. एआय आणि एफआरएस प्रणालीद्वारे एखादी संशयित व्यक्ती किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीची व्यक्ती आढळल्यास तात्काळ सूचना दिल्या जातात. हे कॅमेरे चोरीची किंवा संशयास्पद वाहने देखील ओळखतात, ज्यामुळे कारवाई करण्यात मदत होते.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात बसलेले दहशतवादी भारतात मोठ्या दहशतवादी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच दिल्लीत लाल किल्ल्याजवळ अत्यंत मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये काही डॉक्टरांची नावे पुढे आली. अनेक लोकांचे जीव या दहशतवादी हल्ल्यात गेली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ज्याप्रकारे पाकिस्तानात घुसून मोठी कारवाई केली, त्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली असून भारतात दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न केला जात आहे.