Udaipur Murder : उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येचे 26/11 कनेक्शन, मुंबईवरील हल्ल्याची आठवण म्हणून बाईकला लावला खास नंबर

26 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण म्हणून आरोपी रियाझने हा विशेष क्रमांक घेतला होता. दुचाकी खरेदी आणि विशेष क्रमांकाचा तपशील घेण्याचे काम पोलिसांचे पथक करत आहे. ही बाईक 2013 मध्ये खरेदी केली होती आणि 5000 रुपये अतिरिक्त देऊन हा खास नंबर घेण्यात आला होता.

Udaipur Murder : उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येचे 26/11 कनेक्शन, मुंबईवरील हल्ल्याची आठवण म्हणून बाईकला लावला खास नंबर
उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येचे 26/11 कनेक्शन
Image Credit source: Google
वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 01, 2022 | 7:04 PM

जयपूर : नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यावरुन उदयपूरमधील एका शिंप्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येचे आता 26/11 च्या मुंबईवरील हल्ल्या (Mumbai Attack)शी कनेक्शन समोर आले आहे. कन्हैयालालची हत्या करुन रियाझ आणि गोस ज्या बाईकवरुन पळून गेले त्या बाईकचा नंबर (Bike No) 2611 आहे. 26 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण म्हणून आरोपी रियाझने हा विशेष क्रमांक (Special No) घेतला होता. दुचाकी खरेदी आणि विशेष क्रमांकाचा तपशील घेण्याचे काम पोलिसांचे पथक करत आहे. ही बाईक 2013 मध्ये खरेदी केली होती आणि 5000 रुपये अतिरिक्त देऊन हा खास नंबर घेण्यात आला होता. 29 जून रोजी कन्हैयालालची त्याच्या दुकानात हत्या केल्यानंतर आरोपींनी या दुचाकीवरून पळ काढला, त्याला राजसमंद येथील भीमा येथे नाकाबंदीत पकडण्यात आले.

हत्येचा कट रचल्याप्रकरणी आणखी दोघांना अटक

कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपी रियाझ आणि गोस यांना गुरुवारी रात्री उशिरा अजमेर तुरुंगात हलवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पोलिस चौकशीत सांगितले की, कन्हैयालालशिवाय आणखी एक व्यक्ती त्यांच्या टार्गेटमध्ये होती. एवढेच नाही तर हत्येचा कट रचल्याप्रकरणी तपास पथकाने गुरुवारी रात्री उशिरा आणखी 2 जणांना अटक केली आहे. यासोबतच या प्रकरणात कानपूरच्या मरकजची भूमिकाही संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. आता मुंबई हल्ल्याच्या तारखेशी जोडलेल्या दुचाकी क्रमांकामागील आरोपींचा हेतूही तपासला जाणार आहे.

कन्हैयालाल व्यतिरिक्त आणखी काही लोक होते टार्गेटवर

कन्हैयालाल हत्याकांडात दहशतवादी संघटनांची भूमिका आणि आरोपींचे पाकिस्तान कनेक्शनही तपासले जात आहे. ही हत्या करणाऱ्या आरोपी रियाज आणि गोस मोहम्मद यांच्या मोबाईल व्हॉट्सअॅप चॅटवरून तपास पथकाला महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आरोपींनी हत्येचा व्हिडिओ पाकिस्तानमधून चालवल्या जाणाऱ्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठवला होता, अशीही माहिती मिळाली आहे. कन्हैयालालव्यतिरिक्त आणखी काही लोक आरोपींच्या निशाण्यावर होते. (Riaz and Goss put a special number on the bike to commemorate the Mumbai attacks)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें