
बिहार निवडणुकीच्या निकालानंतर लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य सतत चर्चेत आहे. ती निवडणूकीच्या निकालावर स्पष्ट भूमिका मांडताना दिसत आहे. आता त्यांनी नवीन पोस्ट करून संजय यादव आणि रमीजवर ‘शिवीगाळ करुन, मारण्यासाठी चप्पल उगारल्याचा’ गंभीर आरोप केला आहे. तसेच त्यांनी पुढे पोस्टमध्ये सांगितले की त्यांनी आई-वडिलांचे घर कायमचे सोडले आहे. रोहिणी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता त्या नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या…
काय आहे पोस्ट?
रोहिणी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये, ‘काल एका मुलीला, एका बहिणीला, एका लग्न झालेल्या महिलेला, एका आईला अपमानित करण्यात आले. अश्लील वाक्य, शिवीगाळ करण्यात आली, मारण्यासाठी चप्पल उचलण्यात आली. मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. मी सत्याचा त्याग केलेला नाही, फक्त आणि फक्त याच कारणाने मला अपमान सहन करावा लागला .. काल एक मुलगी आपल्या रडत्या आई-वडिलांना, बहिणींना सोडून जबरदस्तीने निघून गेली. माझ्यापासून माझे माहेर हिरावून घेण्यात आले.. मला अनाथ बनवण्यात आले… असे म्हटले आहे.
2019 मध्ये लढली निवडणूक
रोहिणी या पटण्याच्या गल्लोबागेत लहानाच्या मोठ्या झाल्या. लालूंच्या राजकीय उथलपुथलमध्ये ती मोठी झाली. तिने वडिलांच्या करिअरमधील अनेक चढउतार पाहिले. लग्नानंतरही ती माहेरच्या कुटुंबाशी जोडलेली राहिली. 2019 मध्ये सरायहानमधून निवडणूक लढली, हरल्यावरही त्यांनी हार मानली नाही. लालू यादव यांना किडनी दानाने त्यांना हीरोइन बनवले. पण राजकारणात त्या मागे पडल्या. बिहार निवडणुकीत आरजेडीच्या पराभवानंतर प्रश्न उपस्थित करणे त्यांना महागात पडले. तेजस्वी यादवांच्या सर्वात जवळच्या संजय आणि रमीजवर यांच्यावर बोट उचलल्यामुळे त्यांना घरातून बाहेर काढण्यात आले.
पटण्याच्या हृदयस्थानी असलेल्या राबडी निवासात सध्या वाद सुरु असल्याचे दिसत आहे. या निवासात कधी काळी लालू प्रसाद यादव आनंदाने राहात होते. आता या घरावार उदासीनतेची सावली पडल्याचे दिसत आहे. रोहिणी आचार्य, लालू यादव यांची सर्वात लहान मुली आहे, ज्या 2023 मध्ये त्यांच्या वडिलांना किडनी दान करून संपूर्ण देशात ‘वीरांगना’ झाल्या होत्या. त्या स्वतःच्या घरातच एक अनपेक्षित लढाई लढत होत्या. 15 नोव्हेंबर 2025 हा तो दिवस, जेव्हा बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडीचा पराभव झाला. त्यानंतर लालू यांच्या कुटुंबावर मोठे संकट आले. रोहिणी, ज्या 2024 मध्ये सरणमधून लोकसभा निवडणूक लढल्या होत्या. त्यांनी पराभवानंतर प्रश्न उपस्थित करण्याची हिंमत दाखवली. पण या सगळ्याच्या बदल्यात त्यांना अपमान सहन करावा लागला.