AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohan Bhagwat: लव्ह जिहाद कसा थांबवणार? RSS प्रमुख मोहन भागवतांचा मंत्र, म्हणाले कुटुंबात…

RSS Chief Mohan Bhagwat big statement: लव्ह जिहाद हा विषय अत्यंत नाजूक ठरला आहे. यावरून विविध चित्रपटांतून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्नही झाला. लव्ह जिहादविरोधात हिंदुत्ववादी संघटना कायम आक्रमक असतात. आता यामुद्दावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Mohan Bhagwat: लव्ह जिहाद कसा थांबवणार? RSS प्रमुख मोहन भागवतांचा मंत्र, म्हणाले कुटुंबात...
मोहन भागवत, लव्ह जिहाद
| Updated on: Jan 04, 2026 | 12:20 PM
Share

RSS Chief Mohan Bhagwat on Love Jihad: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लव्ह जिहादवर भाष्य केले आहे. कुटुंबात पालक आणि मुलांमधील संवाद आणि त्यांच्यातील घट्ट नाते लव्ह जिहाद सारख्या घटना थांबवू शकतात, असे सरसंघचालक म्हणाले. जेव्हा घरात आणि कुटुंबात मुलांशी तुम्ही नियमित संवाद साधणार तेव्हा अशा घटनांवर अंकुश लागले. मुलांच्या भावना समजून घेता येतील. त्यामुळे या घटनांना आळा बसेल असे भागवत म्हणाले. भोपाळ येथील शिवनेरी भवन येथ आयोजित स्त्री शक्ती संवाद या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी याविषयावर चांगलीच बैठक घेतली.

संवादाच्या कमीमुळे लव्ह जिहाद

भागवत म्हणाले की, आपल्याला हे समजून घ्यायला हवे की अनोळखी व्यक्ती आपल्या मुलीला कसा भलवू शकतो? कुटुंबातील विसंवाद, सदस्यांमधील संवादातील कमी याचे या प्रकरणात मोठे योगदान आहे. जेव्हा कुटुंबात नियमित संवाद होईल. तुम्ही मुलांशी संवाद साधला तर त्यांना धर्म, संस्कृती आणि पंरपरांची माहिती होईल, त्यांच्याविषयीचा स्वाभाविक सन्मान समोर येईल.यावेळी त्यांनी लव्ह जिहाद थोपवण्यासाठी त्रिसूत्री सुद्धा सांगितली.

लव्ह जिहाद थांबवण्यासाठी त्रिसूत्री काय?

सरसंघचालक मोहन भागवत यांनी लव्ह जिहाद थांबवण्यासाठी तीन महत्वपूर्ण उपाय सांगितले. त्यांनी यावेळी त्रिसूत्री सांगितली. कुटुंबात नियमित संवाद, मुलींमध्ये सजगता आणि आत्मसुरक्षेची भावना निर्माण करणे आणि लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणे या त्रिसूत्रींवर त्यांनी जोर दिला. सामाजिक संघटनांवर ही त्यांनी जबाबदारी निश्चित केली. अशा कोणत्याही घटनांबाबत सामाजिक संघटनांनी सजग राहावे. अशा घटनांविरोधात समाजाने एकत्रित येऊन विरोध करावा, तेव्हाच लव्ह जिहादवर समाधानकारक तोडगा निघेल याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महिलांमुळे धर्म आणि संस्कृती सुरक्षित

जेव्हा समाज सभ्यतेचे गोडवे गातो. तेव्हा त्यात महिलांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते. आपला धर्म, आपली संस्कृती आणि सामाजिक व्यवस्था महिलांमुळे सुरक्षित असल्याचे भागवत म्हणाले. पुरुष आणि महिला हे दोन्ही मिळून समाजाला पुढे नेतात. त्यामुळे दोघांनी सजग राहणे आणि जागरुक राहणे आवश्यक असल्याचे भागवत म्हणाले. पश्चिम समाजातील स्त्रीयांची स्थिती आणि भारतीय मातृत्व केंद्रीत समाज याची तुलना करत यामुळे भारतीय संस्कृती उंच स्थानी असल्याचे भागवत म्हणाले. यावेळी सरसंघचालकांनी लव्ह जिहादवर त्रिसूत्रीची माहिती देत त्याचा वापर करण्याचे समाजाला आवाहन केले.

ठाकरे बंधूंचा 'शिवशक्ती' वचननामा जाहीर; राज 20 वर्षांनी शिवसेना भवनात
ठाकरे बंधूंचा 'शिवशक्ती' वचननामा जाहीर; राज 20 वर्षांनी शिवसेना भवनात.
BMC Election | महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा
BMC Election | महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा.
Devendra Fadnavis | सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे
Devendra Fadnavis | सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
Shambhuraj Desai | शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणं अशक्य
Shambhuraj Desai | शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणं अशक्य.
उद्धवमामूंचा महापौर झाला तर...; अमित साटम यांचा ठाकरेंना टोला
उद्धवमामूंचा महापौर झाला तर...; अमित साटम यांचा ठाकरेंना टोला.
बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट घेताना अमित ठाकरे झाले भावूक
बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट घेताना अमित ठाकरे झाले भावूक.
ठाण्यात उमेदवारांना दमदाटी! अविनाश जाधवांचा गंभीर आरोप
ठाण्यात उमेदवारांना दमदाटी! अविनाश जाधवांचा गंभीर आरोप.
Jalgaon| कडाक्याच्या थंडीमुळे केळीच्या उत्पादनाला करपा रोगाने घेरलं
Jalgaon| कडाक्याच्या थंडीमुळे केळीच्या उत्पादनाला करपा रोगाने घेरलं.
गॉगल लावत, कॉलर उडवली अन् उदयनराजे गाण्यावर थिरकले | VIDEO
गॉगल लावत, कॉलर उडवली अन् उदयनराजे गाण्यावर थिरकले | VIDEO.
मुंबईसाठी प्रकाशित केलेल्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नेमकं काय?
मुंबईसाठी प्रकाशित केलेल्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नेमकं काय?.