मोठी बातमी! या बलाढ्य देशाची भारताला थेट मोठी ऑफर, होणार फायदाच फायदा, ट्रम्प यांना 440 व्होल्टचा झटका

अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिका आणि भारताचे संबंध ताणले गेले आहेत, व्यापारावर देखील याचा मोठा परिणाम झाला आहे, मात्र आता भारतासाठी एक मोठी गुडन्यूज समोर आली असून, भारताला मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यात आहे.

मोठी बातमी! या बलाढ्य देशाची भारताला थेट मोठी ऑफर, होणार फायदाच फायदा, ट्रम्प यांना 440 व्होल्टचा झटका
डोनाल्ड ट्रम्प
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Nov 20, 2025 | 10:08 PM

अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा परिणाम हा दोन्ही देशांमधील व्यापारावर झाला असून, त्यानंतर आता भारताची रशिया आणि चीनशी जवळीक वाढताना दिसत आहे. रशिया भारतासोबत व्यापार वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. रशियाने यापूर्वीच भारताला कच्चा तेलाच्या किमतीमध्ये मोठी सूट दिली आहे. आता रशियाकडून भारताला पुन्हा एकदा नवी ऑफर देण्यात आली आहे. रशियाकडून भारताला बंदर पायाभूत सुविधा आणि जहाजबांधणी क्षेत्रामध्ये नवीन ऑफर देण्यात आली आहे. रशियाकडून या क्षेत्रात भारताला अनेक नवीन प्रस्ताव देण्यात आले आहेत. रशियाकडून इंडो पॅसिफिक प्रदेशात सागरी भागीदारी वाढविण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून आता या ऑफरकडे बघितलं जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार रशिया आता भारताला प्रवासी जहाजे, मासेमारी करण्यासाठीचे अद्ययावत जहाजे आणि त्याचं तंत्रज्ञान पुरवण्याच्या तयारीमध्ये आहे. दरम्यान रशियाच्या या ऑफरमुळे आता अमेरिकेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणले गेले आहेत. याचा फायदा घेऊन रशिया आणि चीनकडून भारतासोबत व्यापार वाढवण्याचा प्रयत्न सातत्यानं होत आहे. मात्र भारताची चीन आणि रशियासोबत वाढत असलेली जवळीक अमेरिकेसाठी डोकेदुखीचा विषय ठरली आहे, रशिया आणि भारत आणखी जवळ येऊन आपण एक मोठा व्यापारी भागीदार देश गमावू अशी भीती अमेरिकेच्या मनात आहे. अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर आम्ही भारतीय वस्तूंचं आमच्या बाजारपेठेत स्वागत करू असं रशिया आणि चनीने म्हटलं होतं. तसेच समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारताची अमेरिकेत होणारी निर्यात कमी होऊन, रशिया आणि चीनमधील निर्यात वाढल्याचं देखील समोर आलं आहे.

काय आहे रशियाचा नवा प्रस्ताव

रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांचे खास सल्लागार असलेले निकोलाई पैट्रुशेव हे भारताच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये बंदरांमधील पायाभूत सुविधा, मासे पकडण्यासाठीचे तसेच प्रवासासाठीचे अद्ययावत जहाजे आणि समुद्री मार्गाने होणाऱ्या आयात -निर्यातीमध्ये सुधारणा, जहाजांच्या चालकांना ट्रेनिंग अशा विविध विषयांवर चर्चा झाली आहे.