भारताला रशियाकडून सर्वात मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली; नेमकं काय होणार?
रशिया आणि भारत यांच्यातील संबंध अगोदरपासून सलोख्याचे राहिलेले आहेत. आता रशियाने भारताला मोठी ऑफर दिली आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Russia India Relations : व्यापार तूट भरून काढण्यासाठी अमेरिका भारताव वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला टॅरीफ हा त्याचाच एक भाग आहे. हा टॅरीफ कमी करण्यासाठी भारत अमेरिकेसोबत चर्चा करत आहे. दुसरीकडे नवे व्यापार करार करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात चर्चा चाल आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी करावी यासाठीदेखील अमेरिकेचा प्रयत्न चालू आहे. भारताचा तसेच इतर देशांचा रशियासोबतचा व्यापार कमी व्हावा यासाठी अमेरिकेने रशियातील दोन बड्या तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. असे असतानाच आता रशियाने भारताला मोठी ऑफर दिली आहे. सोबतच डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढवणारी भूमिका रशियाने घेतली आहे.
भारताला स्वस्तात तेल देण्यास रशिया तयार
मिळालेल्या माहितीनुसार भारतासोबत शस्त्रास्त्रांचा व्यापार वाढवा यासाठी रशियाने भारतापुढे मोठा प्रस्ताव ठेवला आहे. रशियाने भारताला पाचव्या पिढीच्या Su-57 स्टील्थ या लढाऊ विमानाचे तंत्र भारताला देण्याची तयारी दाखवली आहे. रशियाचे भारतातील राजदूत डेनीस अलिपोव्ह यांनी तशी माहिती दिली आहे. पश्मिमी देशांकडून भारतावर दबाव टाकला जात आहे. असे असताना रशियातून भारताला मोठ्या प्रमाणात तेलाची निर्यात केली जाते. अजूनही आम्ही इंधन खरेदीच्या बाबतीत भारतापुढे चांगला आणि किफायतशीर प्रस्ताव ठेवण्यास तयार आहोत, असेही अलिपोव्ह म्हणाले.
भारताची केल प्रशंसा, ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं
रशियाकडून तुम्ही इंधन आणि तेल खरेदी करू नका, असे पश्चिमी देशांकडून भारताला सांगितले जात आहे. भारत मात्र नागरिकांची गरज लक्षात घेऊन भविष्यातही रशियाकडून तेल खरेदी करत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारत-रशिया यांच्यात अंतर पडावे म्हणून पश्चिमी देशांकडून दबाव टाकला जातोय. भारताने मात्र या दबावाला मोठ्या ताकदीने तोंड दिलेले आहे, असे म्हणते डेनीस यांनी भारताच्या धोरणाची प्रशंसा केली. दरम्यान, आता रशियाने भारताला लढाऊ विमानाचे तंत्र देण्याची तयारी दाखवल्यामुळे तसेच स्वस्तात तेल विकण्याचीही तयारी दाखवल्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय करणार? याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.
