Sabang Election Result 2021 LIVE : सबंग विधानसभा मतदारसंघात भाजप-टीएमसीमध्ये कडवी झुंज, जाणून घ्या लाईव्ह अपडेट्स

Assembly Election Result 2021 Live Update in Marathi | सबंग विधानसभा मतदारसंघातील क्षणोक्षणाचे लाईव्ह अपडेट्स

Sabang Election Result 2021 LIVE : सबंग विधानसभा मतदारसंघात भाजप-टीएमसीमध्ये कडवी झुंज, जाणून घ्या लाईव्ह अपडेट्स
Assembly Election Result 2021 Live Update in Marathi | सबंग विधानसभा मतदारसंघातील क्षणोक्षणाचे लाईव्ह अपडेट्स

कोलकाता : देशभरात सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा (West Bengal Assembly Election 2021) निकाल लवकरच जाहीर होणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील कंबर कसली. बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून इथल्या राजकीय घडामोडींना वेग आला होता. या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस व्यतिरिक्त इतरही पक्षांनीही प्रचंड तयारी केलीय. बंगालमध्ये कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा न घेण्याचं जाहीर केलं होतं. त्याच कॉंग्रेसच्या बंगालमधील बालेकिल्ल्यात त्याचा काय फरक पडेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आम्ही बंगालमधील कॉंग्रेसचा गड असलेल्या (Sabang Vidhansabha) सबंग विधानसभा मतदारसंघा विषयी बोलतोय.

सबंग मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला

सबंग विधानसभा मतदारसंघ हा पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्यात येतो. यावेळेस या मतदारसंघात पंचरंगी निवडणूक बघायला मिळतेय. म्हणजेच यंदाच्या निवडणुकीसाठी या मतदारसंघातून 5 उमेदवार आमनेसामने आहेत. सबंग मतदारसंघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसचा गढ समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात भाजपने त्यांचे दिग्गज नेते अमूल्य मैती यांना उमेदवारी दिली आहे. तर तृणमूल काँग्रेसने मानस रंजन भुनिया यांना मैदानात उतरवलं आहे. काँग्रेस-लेफ्ट युतीमधून ही जागा काँग्रेसला मिळाली आहे. काँग्रेसने या मतदारसंघात चिरंजीव भौमिक यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात निवडणूक जरी पंचरंगी असली तरी भाजप आणि टीएमसीमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

मानस भुनिया यांची विजयी हॅटट्रिक

पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर जिल्ह्यातील सबंग विधानसभेवर गेल्या 15 वर्षांपासून म्हणजेच गेल्या 3 टर्मपासून काँग्रेसचं वर्चस्व आहे. गत विधानसभा निवडणुकीत 2016 मध्ये काँग्रेसच्या मानस भुनिया यांनी विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली होती. त्यांनी सत्ताधारी पक्षाचे निर्मल घोष यांचा 49 हजार 167 इतक्या मोठ्या मताधिक्यांनी पराभव केला होता. भुनिया यांना तेव्हा एकूण 1 लाख 26 हजार 987 इतके मतं मिळाले होते. तर 77 हजार 820 मतदारांनी निर्मल घोष यांना आपले मत दिले होते. तर भाजपचा तिसरा क्रमांक होता. भाजपला एकूण 5 हजार 610 इतकी मतं मिळाली होती.

दरम्यान, भुनिया यांनी नंतर काँग्रेसचा हात सोडला. यानंतर त्यांना टीएमसीने राज्यसभेवर पाठवलं. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत मानस भुनिया यांची पत्नी राणी भुनिया या टीएमसीच्या तिकीटावर निवडून आल्या. या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार गीता राणी भुनिया यांना 1 लाख 6 हजार 179 मत मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी रिता मंडळ यांना 41 हजार 987 मतदारांनी कौल दिला. भाजप उमेदवार अंतरा भट्टाचार्य या 37 हजार 476 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यावेळेस एकूण मतदारांची संख्या ही 2 लाख 41 हजार 645 इतकी होती.

पहिल्यांदा विजयी कोण?

या मतदारसंघात पहिल्यांदा 1952 मध्ये निवडणूक पार पडली होती. त्यावेळेस काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला होता. या मतदार संघात सुरुवातीपासून काँग्रेसचा दबदबा आहे. काँग्रेसने या मतदारसंघात सलग 3 वेळा विजय मिळवला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीची आकडेवारी

विद्यमान आमदार : गीता राणी भुनिया

एकूण मतदान : 106179

एकूण मतदार : 241645

व्होटर टर्नआउट : 88.72 टक्के

एकूण उमेदवार : 4

(Sabang Election Result 2021 Live Counting and Updates West Bengal Sabang Assembly MLA Seat Geeta Rani Bhunia Candidate Party Winner Name Latest News in marathi)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI