AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sabrimala Gold Stolen: इतकं सोपं आहे का 4.5 किलो सोनं चोरणं? कुठे गायब झालं सबरीमाला मंदिरातील सोनं?

Sabrimala Gold Stolen: केरळच्या सबरीमाला मंदिराच्या पवित्र गाभाऱ्यातून सोने गायब झाल्याची घटना सध्या चर्चेत आहे. मंदिरामधून ४७४.९० ग्रॅम सोने रहस्यमय पद्धतीने चोरीला गेले होते. या चोरीची संपूर्ण कहाणी चला जाणून घेऊया...

Sabrimala Gold Stolen: इतकं सोपं आहे का 4.5 किलो सोनं चोरणं? कुठे गायब झालं सबरीमाला मंदिरातील सोनं?
Sabrimala gold ScamImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 04, 2025 | 3:57 PM
Share

केरळच्या सबरीमाला मंदिरातून सोने गायब झाल्याची घटना सध्या खूप चर्चेत आहे. मंदिरातील ४७४.९० ग्रॅम सोने रहस्यमय पद्धतीने चोरीला गेले होते. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीने सोमवारी स्पॉन्सर उन्नीकृष्णन पोट्टी यांना अटक केली होती. पण तुम्हाला माहितीये का २०१९ चे सबरीमाला मंदिर चोरी प्रकरण काय आहे? जाणून घ्या सविस्तर…

२०१९ साली केरळच्या प्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याची चोरी झाली होती. हे ते मंदिर आहे जिथे दरवर्षी लाखो भाविक भगवान अयप्पांच्या दर्शनासाठी येतात. मंदिरातून सुमारे ४.५ किलोग्रॅम सोने चोरीला गेले होते. त्या वेळी चोरी झालेल्या सोन्याची किंमत ५५ लाख रुपये होती. हे सोने मंदिराच्या गाभाऱ्यात (संक्टम संक्रोरम) आणि द्वारपालक मूर्तींच्या प्लेटिंगसाठी वापरले गेले होते. प्रत्यक्षात, जेव्हा मंदिर प्रशासनाने या सोन्याच्या प्लेट्स पुन्हा प्लेटिंगसाठी पाठवल्या, तेव्हा दस्तऐवजात गडबड आढळली. चौकशीत समोर आले की वापरलेले सोने हे बनवाट किंवा भेसळयुक्त आहे.

सबरीमाला मंदिरातील चोरीची संपूर्ण कहाणी

आश्चर्याची बाब म्हणजे, २०१९ मध्ये सोन्याची परत चढवलेल्या द्वारपालक प्लेट्स इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी दिल्या गेल्या, त्या वेळी एन वासु हे टीडीबीचे अध्यक्ष होते. त्यांनी याआधी कमिश्नर म्हणूनही काम केले होते. हाच तो काळ होता जेव्हा उन्नीकृष्णन पोट्टी यांना सोने चढवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. याच काळात मंदिरातील मौल्यवान सोने रहस्यमय पद्धतीने गायब झाले. पोट्टी यांनी तेव्हा वासु यांना पत्र लिहिले होते.

सबरीमाला मंदिराचे सोने कोणी चोरले?

त्या पत्रात उन्नीकृष्णन पोट्टी यांनी दावा केला होता की इलेक्ट्रोप्लेटिंगनंतर काही अतिरिक्त सोने शिल्लक राहिले आहे. त्यांनी सुचवले होते की ही शिल्लक रक्कम एखाद्या गरीब महिलेच्या लग्नासाठी मदत म्हणून वापरली जावी. पण आता जेव्हा एसआयटीने या संपूर्ण प्रकरणाची खोलवर चौकशी सुरू केली, तेव्हा ते पत्र महत्त्वाचा पुरावा ठरले आहे. एसआयटी टीडीबीच्या इतर सदस्यांकडूनही चौकशी करणार आहे. चौकशी पथक मंदिराच्या गाभाऱ्यातून गायब झालेले सोने शोधण्यात लागले आहे. नेमके कोणत्या टप्प्यात, कोणाच्या माध्यमातून आणि कधी बेपत्ता झाले हे शोधण्याचा ते प्रयत्न करत आहेत. दरम्यान, असा अंदाज आहे की एसआयटीची ही दुसरी अटक प्रकरणाची दिशा पूर्णपणे बदलू शकते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...