साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद मृत्यू , 4 तासांनी केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे वाढलं गूढ

सनातन धर्म प्रचारक साध्वी प्रेम बैसा यांचा जोधपूरमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या चार तासांनंतर, त्यांच्या इंस्टाग्रामवर एक कथित सुसाईड नोट पोस्ट करण्यात आली, ज्यामध्ये सोशल मीडियावर ट्रोल आणि ब्लॅकमेल केल्याबद्दल त्यांचे दुःख व्यक्त करण्यात आले.तिचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल करून एका तरुणाने तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.

साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद मृत्यू , 4 तासांनी केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे वाढलं गूढ
साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद मृत्यू
| Updated on: Jan 29, 2026 | 2:37 PM

जोधपूरमधून एक खळबळजनक आणि भावनिक घटना समोर आली आहे. सनातन धर्माच्या प्रचारक साध्वी प्रेम बैसा यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या सुमारे चार तासांनंतर, त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सोशल मीडियावर एक कथित सुसाईड नोट पोस्ट झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाने एक नवीन वळण घेतले. ही पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंग, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळ असे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

साध्वी प्रेम बैसा काही काळापासून सोशल मीडियावर खूप सक्रिय होत्या आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. या व्हिडिओंमध्ये तिने एका पुरूषावर गंभीर आरोप केले होते. व्हायरल व्हिडिओ तिच्या वडिलांबद्दल होता, परंतु तो एडिट करून खोटा प्रसारित करण्यात आला होता, असं साध्वीने सांगितलं.ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत तिने पोलिस तक्रारही दाखल केली. पोलिस कारवाईनंतर, आरोपीला अटक करण्यात आली, त्यानंतर त्याच्या कुटुंबाने साध्वीची माफी मागितली. तेव्हा साध्वीने मोठी उदारता दाखवत आरोपीला माफ केले.

मात्र तो आरोपी जेलबाहेर आल्यावर त्याच व्यक्तीने व्हिडिओ पुन्हा एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केला, त्यामुळे साध्वीला ट्रोलिंगचा सामना करावा लागाल, असा आरोप आहे. सोशल मीडियावरील सततच्या कमेंट्स आणि मानसिक दबावामुळे त्या इतक्या निराश झाल्या की त्यांना हे टोकाचे पाऊल उचलावे लागले? असाच प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहे.

सुसाईड नोटमध्ये काय होतं ?

साध्वीच्या मृत्यूच्या चार तासांनंतर तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आलेल्या पोस्टमध्ये तिने तिचे जीवन आणि विचार शब्दांत मांडले होते. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सनातन धर्माच्या प्रसारासाठी जगले आणि शेवटच्या श्वासापर्यंत सनातन माझ्या हृदयात होतं, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहीलं होतं.

त्यांनी पुढे असंही लिहीलं होतं की, त्यांनी आदि जगतगुरू शंकराचार्य आणि देशातील अनेक संत आणि ऋषींना अग्निपरीक्षेसाठी लेखी विनंती केली होती, परंतु कदाचित निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. जिवंत असताना तर नाही पण मृत्यूनंतर तरी न्याय मिळवा अपेक्षा त्यांनी पोस्टच्या शेवटी व्यक्त केली होकी. मात्र या पोस्टबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत आहे. ही पोस्ट त्यांनी आधीच शेड्यूल केली असावी आणि मृत्यूनंतर ती आपोआप सोशल मीडियावर प्रकाशित झाली असावी असा संशय आहे. पोलिस आता या तांत्रिक पैलूचीही चौकशी करत आहेत.

आश्रमात हंगामा

साध्वीचट्या मृत्यूनंतर त्या रात्री आरती नगर येथील आश्रमात मोठा गोंधळ उडाला. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप स्थानिक आणि समर्थकांनी केला आहे. साध्वीच्या वडिलांनी सुरुवातीला शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने तणाव अधिकच वाढला होता. लोकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला आणि शवविच्छेदन करण्याचा आग्रह धरला. आश्रमातील सीसीटीव्ही फुटेज गहाळ असल्याचा आरोपही त्यांनी केला. साध्वी प्रेम बैसा यांच्या मृत्युने केवळ जोधपूरमध्येच नव्हे तर सगळीकडे खळबळ उडाली आहे.