AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : शिवेसना भवन जाळण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेत्याच्या मुलाच्या लग्नाला उद्धव ठाकरेंची हजेरी, राऊत म्हणाले मी हे कधीच विसरु…

"देशभरातल्या विरोधी पक्षाच्या आमदार, खासदारांची कोंडी केली जात आहे. ओडिसामध्ये राज्यसभेची निवडणूक झाली. निवडून कोणाला आणला भाजपने, दिलीप रे यांना. ज्यांना भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली कोळसा घोटाळ्यात शिक्षा ठोठावली, तुरुंगावास भोगला अशा लोकांना तुम्ही निवडून आणता आणि ज्यांना लोकांनी निवडून दिलय, त्यांची तुम्ही कोंडी करताय" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : शिवेसना भवन जाळण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेत्याच्या मुलाच्या लग्नाला उद्धव ठाकरेंची हजेरी, राऊत म्हणाले मी हे कधीच विसरु...
Sanjay Raut
| Updated on: Mar 18, 2026 | 10:40 AM
Share

“दिल्लीत आपण ज्यांची नाव घेताय ते नेहमीच येत असतात. उपमुख्यमंत्री शिंदे असतील हे जे पक्ष आहेत, ते पक्ष म्हणजे भाजपची अंगवस्त्र आहेत अणि अमित शाह यांनी स्थापन केलेले पक्ष आहेत. अजित पवारांचा पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष नाही. एकनाथ शिंदे यांचा गट बाळासाहेबांचा पक्ष नाही. हे अमित शाह यांनी स्थापन केलेले पक्ष आहेत. नरेंद्र मोदी त्यांचे मार्गदर्शक आहेत. आमचे मार्गदर्शक बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकेर, उद्धव ठाकरे हे आहेत” असं संजय राऊत एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर म्हणाले. “तुम्ही जे म्हणताय ऑपरेशन टायगर ठीक आहे, मूळात शाह आणि मोदींनी या सगळ्या लोकांची मांजर केलेली आहे. सत्ता, पैसा आहे मोठ्या प्रमाणात. तपास यंत्रणा आहेत, निवडणूक यंत्रणा हाताशी आहे. त्याचा गैरवापर करुन हे आमिष दाखवतात, धमक्या देतात. हे फारकाळ चालणार नाही” असं संजय राऊत म्हणाले.

“इथे जर ऑपरेशन टायगर करायला कोणी आलं असेल तर त्यांनी दिल्लीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. या दिल्लीला पानीपतापासून मोगलकाळापासून फार मोठा इतिहास आहे. इथे असं ऑपरेशन करायला आले ते निर्वस्त्र होऊन आपल्या राज्यात गेलेत. परागंदा त्यांना व्हाव लागलं. या दिल्लीतून कधी ना कधी प्रत्येकाला जावच लागत. ही दिल्ली कोणाची नाही हे ऑपरेशन करायाला येणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे” असं राऊत बोलले.

‘याच्या बापाचा पैसा आहे’

“आमचे नऊ खासदार चार दिवसापूर्वी इथेच बैठकीला आले होते. प्रत्येकाच्या मतदारसंघातल्या अडचणी आहेत. कोणात्याही प्रकारचा निधी विरोधी पक्षाच्या आमदार, खासदारांना दिला जात नाही. त्यांची कोंडी केली जाते. केंद्राच्या, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रशासन, जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना आहेत, विरोधी पक्षाच्या आमदार, खासदारांच्या कामाची दखल घ्यायची नाही. याच्या बापाचा पैसा आहे. धुणी, भांडी करुन याच्या बापजाद्यांनी पैसा जमा केलाय. महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा आहे. विरोधी पक्षाचे आमदार, खासदार निवडून आलेत, त्या भागांचा विकास होणं सुद्धा गरजेचं आहे” असं संजय राऊत यांनी सांगितलं

ती मुलगी नसून निर्जीव बाहुली आहे अशी उत्तर तुम्हाला..

अहिल्यानगरमध्ये 11 वर्षाच्या मुलीवर अॅसिड हल्ला झाला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, “असं काही घडलेलं नाही असं देवेंद्र फडणवीस सांगतिलं. सरकार सक्षम आहे. गृहखात्याच लक्ष आहे. आमच्या राज्यात महिला, मुली सुरक्षित आहेत. विरोधक खोटा प्रचार करतायत. ज्या मुलीवर अॅसिड टाकलेलं आहे ती मुलगी नसून निर्जीव बाहुली आहे अशी उत्तर तुम्हाला विधानसभेत ऐकायला मिळू शकतात”. “त्यांच्या पक्षाच्या महिला नेत्यांना हे कधीच दिसणार नाही. एका मुलीवर अॅसिड फेकलय. अशा घटना वारंवार घडत असतील, तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून तुम्ही अपयशी आहात. तुम्ही गृहखात्याचा त्याग केला पाहिजे. कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे अपयशी आहे. फडणवीस यांचा अर्धावेळ दिल्लीत जातो. त्यांना वेळ कुठे आहे हे सर्व पहायला?” अशी टीका राऊत यांनी केली.

माझ्यासारखा शिवसैनिक हे कधीच विसरु शकत नाही

भाजप नेते प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नाला उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला की, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप जवळ येत आहेत का?. त्यावर राऊत म्हणाले की, “प्रसाद लाड यांनी शिवेसना भवन जाळून टाकू अशी भाषा केली होती. पण महाराष्ट्रातली संस्कृती आहे. अशा शुभ प्रसंगी राजकारण आणयाच नसतं. मुलाच लग्न होतं म्हणून ते गेले असतील” “याच प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन जाळण्याची, शिवसेना भवनवर दगड मारण्याची भाषा केली होती हे माझ्यासारखा शिवसैनिक कधीच विसरु शकत नाही” असं संजय राऊत म्हणाले.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल