भारत की पाकिस्तान, सानिया मिर्झाच्या मुलाकडे कोणत्या देशाचे नागरिकत्व? ऐकून व्हाल हैराण
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. त्यानंतर आता पहलगाम हल्ल्यानंतर त्यांच्या मुलाचे नागरिकत्व काय, तो कोणत्या देशाचा नागरिक आहे, याबद्दल जाणून घेण्यास उत्सुकता पाहायला मिळत आहे.

पहलगाममध्ये गेल्या आठवड्यात झाल्यानतंर भारत सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने अनेक पाकिस्तानी लोकांचे व्हिसा रद्द केले. त्यांना ४८ तासांची मुदत देत पाकिस्ताना परतण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा मुलगा इजहान कोणत्या देशाचा नागरिक आहे, याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु आहेत. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा काही महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. त्यानंतर आता पहलगाम हल्ल्यानंतर त्यांच्या मुलाचे नागरिकत्व काय, तो कोणत्या देशाचा नागरिक आहे, याबद्दल जाणून घेण्यास उत्सुकता पाहायला मिळत आहे.
सानिया मिर्झा ही भारताची नागरिक आहे. तिच्याकडे भारताचे नागरिकत्व आहे. तिने शोएब मलिकसोबत लग्न झाल्यानंतरही भारतासाठी टेनिस खेळणे सुरु ठेवले. आता घटस्फोटानंतर ती दुबईमध्ये राहते. तर शोएब मलिक हा पाकिस्तानी नागरिक असून तो पाकिस्तानात राहतो.
इजहान यूएईचा नागरिक आहे का?
शोएब मलिकला एकदा एका मुलाखतीत मुलगा इजहानच्या नागरिकत्वाबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला होता. तुमच्या मुलाकडे कोणत्या देशाचे नागरिकत्व असणार असा सवाल शोएबला करण्यात आला होता. त्यावर त्याने कोड्यात उत्तर दिले होते. माझ्या मुलाकडे ना भारताचा नागरिक असेल, ना पाकिस्तानचा, असे त्याने म्हटले होते. त्यावेळी त्याचा रोख संयुक्त अरब अमिरात (यूएईकडे) होता. पण हे शक्य नाही. कारण यूएई सरकार इतर देशांच्या नागरिकांना स्थायी नागरिकत्व देत नाही. तिथे गोल्डन व्हिसा असेल तरच दीर्घकाळ राहता येते. तुम्ही ३० वर्षे तिथे राहिल्यानंतर तुम्हाला नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो. तसेच जर तुम्ही यूएईच्या नागरिकाशी विवाह केल्यास तुम्हाला तेथील नागरिकत्व मिळते. तसेच आई किंवा वडील या दोघांपैकी जर कोणी एक युएईमधील असेल तर मुलाला नागरिकत्व मिळू शकते. पण सानिया-शोएबच्या मुलाच्या बाबतीत हे लागू होत नाही.
भारतीय संविधान काय सांगते?
पाकिस्तानमध्ये दुहेरी नागरिकत्वाची मान्यता आहे, पण भारतीय संविधानात केवळ एकाच नागरिकत्वाची तरतूद आहे. तुम्हाला येथे दुसऱ्या देशाचा पासपोर्ट ठेवता येत नाही. गायक अदनान सामी याने याच कारणाने पाकिस्तानचे नागरिकत्व सोडून भारताचे नागरिकत्व स्वीकारले होते. दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी तुम्हाला भारतीय पासपोर्ट सोडावा लागतो.
भारतीय नागरिकत्व कसे मिळते?
इजहानचे नागरिकत्व नेमकं काय आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण त्याचा जन्म भारतात झाला आहे. १ जुलै १९८७ नंतर भारतात जन्मलेला व्यक्ती भारतीय नागरिक मानला जातो. पण त्यासाठी आई किंवा वडिलांपैकी एकाकडे भारतीय नागरिकत्व असणे गरजेचे आहे. सानियाकडे भारतीय नागरिकत्व असल्याने इजहानच्या नागरिकत्वाची पात्रता पूर्ण होते. पण यात एक अट आहे. ती म्हणजे मुलाच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत पालकांनी भारतीय दूतावासात जाऊन मुलाची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर काही अटी पूर्ण केल्यावर त्याला भारतीय नागरिकत्व मिळू शकते, ज्यात भारतात ७ वर्षे राहणे महत्त्वाचे आहे.
इजहानच्या नागरिकत्वाची स्थिती अजून स्पष्ट नसली तरी, सानियाकडे भारताचे नागरिकत्व असल्याने आणि त्याचा जन्म हैदराबादमध्ये झाल्याने तो भारतीय नागरिकत्वासाठी पात्र ठरतो.
नागरिकत्व कधी रद्द होऊ शकते?
भारतात बेकायदेशीरपणे नागरिकत्व घेतल्यास, दुसऱ्या देशाचा पासपोर्ट असल्यास आणि दहशतवादी कारवायांमध्ये किंवा देशविरोधी कृत्यांमध्ये सहभाग असल्यास नागरिकत्व रद्द केले जाऊ शकते. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक पाकिस्तान्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहे. तर दुसरीकडे इजहानच्या वडिलांचे शोएबचे नागरिकत्व पाकिस्तानी असल्याने त्याच्या नागरिकत्वाच्या चर्चेला उधाण आले आहे.
