AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : रात्री 10.30 वाजता कोणाचा फोन आला? 15 कोटी घेतल्याशिवाय ते खासदार विमानात..संजय राऊत यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडतायत. उद्धव ठाकरे गटाचे खासदार फुटणार अशी चर्चा आहे. दरम्यान संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Sanjay Raut : रात्री 10.30 वाजता कोणाचा फोन आला? 15 कोटी घेतल्याशिवाय ते खासदार विमानात..संजय राऊत यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Sanjay Raut
| Updated on: Jun 17, 2026 | 11:49 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार असं बोललं जातय. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आणि दिल्लीत वेगवान घडामोडी घडतायत. काल रात्री संजय राऊत यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटी रुपये एडवान्समध्ये देण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला. आज सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजभाऊ वाजे त्यांच्यासोबत होते. यावेळी संजय राऊत ती पोस्ट का केली? त्यांना कोणाचा फोन आला या बद्दल खुलासा केला.

“खासदार फुटणार अशी चर्चा आहे. पण आमच्यापर्यंत अशा प्रकारच्या कोणत्याही घडामोडीची अधिकृत माहिती नाही. तुमच्या माध्यमातून या बातम्या ऐकून प्रतिक्रिया देत आहोत” असं संजय राऊत म्हणाले. “काल रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास एका महत्वाच्या माणसाचा फोन आला. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतल जातय असं त्यांनी सांगितलं. मी म्हटलं काय भाव आहे? ते म्हणाले हमी भाव तोच आहे 50 कोटी. आज रात्री 15-15 कोटी पोहोचतील. हे पैसे घेतल्याशिवाय ते खासदार विमानात बसायला तयार नाहीत” असा दावा संजय राऊत यांनी केला

हे सर्व खासदार मशाल चिन्हावर निवडून आलेत

“अशा पद्धतीने पक्ष तोडले, फोडले जात असतील, तर या देशात निवडणुका लढण्याला अर्थ नाही. आमच्या खासदारांची जी नावे येतात ते कुठे आहेत माहीत नाही. कुणी म्हणतात, दिल्लीत आहेत. कुणी म्हणतात त्यांच्या मतदारसंघात आहे. हे सर्व खासदार मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले” असं संजय राऊत म्हणाले.

ही गांडूगिरी, नादाणपणा खपवून घेतला जाणार नाही

“आधी फूट पडली, तेव्हा मोदींच्या नावावर निवडणूक लढवली. मॅनडेटच्या विरोधात आहे, असं सांगितलं जात होतं. आता जे खासदार आमदार असतील ते पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर निवडून आले. आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीवर निवडून आलेले असताना कुणालाही बेईमानी करण्याचा अधिकार नाही. १५-२० कोटी घेऊन. या क्षणी कुणावर आरोप करणार नाही. मागे जे झालं, त्याची पुनरावृत्ती होणरा असेल तर जनता गप्प बसणार नाही. शिवसेना नाहीच. जो राडा व्हायचा तो होईल. ही गांडूगिरी, नादाणपणा खपवून घेतला जाणार नाही” असं राऊत म्हणाले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी