VIDEO: राज्यपालांना आम्हाला स्मरण करून द्यायची गरज काय?; ‘त्या’ पत्रावरून संजय राऊतांचा सवाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून मुख्यमंत्र्यांना काही गोष्टींचं स्मरण करून दिलं आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. (sanjay raut)

VIDEO: राज्यपालांना आम्हाला स्मरण करून द्यायची गरज काय?; 'त्या' पत्रावरून संजय राऊतांचा सवाल
संजय राऊत, शिवसेना खासदार


नवी दिल्ली: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून मुख्यमंत्र्यांना काही गोष्टींचं स्मरण करून दिलं आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. राज्यपालांना आम्हाला स्मरण करून द्यायची गरज काय?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. (sanjay raut slams governor Bhagat Singh Koshyari over letter to cm uddhav thackeray)

संजय राऊत यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधताना हा सवाल केला. राज्यपालांना आम्हाला स्मरण करून द्यायची गरज काय? आम्हीही त्यांना 12 आमदारांच्या यादीचे स्मरण करून देत आहोत. यादी तुमच्याकडे पडली आहे त्या वर सही करा. त्याचे विस्मरण का होतेय हे लक्षात येत नाही ? बाकी सगळं स्मरणात येते यादीचे मात्र विस्मरण होते, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.

राज्यपालांनी काय म्हटलं होतं पत्रात?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून त्यांचं ओबीसी आरक्षणासह इतर गोष्टींवर लक्षं वेधलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं शिष्टमंडळ 23 जून रोजी मला भेटलं. त्यांनी दोन निवेदने मला दिली आहेत. त्यामध्ये त्यांनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवणे, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा, या मागण्या केल्या आहेत. हे तीनही विषय महत्त्वाचे आहेत. त्यावर योग्य कारवाई करुन, याबाबत मला कळवा, असं राज्यपालांनी या पत्रात म्हटलं होतं.

मलिकांची टीका

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही राज्यपालांवर या मुद्द्यावर टीका केली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्यपालांनी पत्रात उल्लेख केला आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द केलं आहे. कोर्टाच्या आदेशावरून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्याच्या निर्णयामुळे नाही हे राज्यपालांना माहीत असायला हवे होते, असा टोला लगावतानाच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र राजकीय उद्देश ठेवून लिहिल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. (sanjay raut slams governor Bhagat Singh Koshyari over letter to cm uddhav thackeray)

संबंधित बातम्या:

ओबीसी आरक्षण राज्याच्या नव्हे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने रद्द; नवाब मलिकांचा राज्यपालांना टोला

विरोधकांनी खोट्या तलवारीचे घाव घालू नये, संजय राऊत यांचा इशारा

देवेंद्र फडणवीसांच्या तिन्ही मागण्या महत्त्वाच्या, त्याबाबत कारवाई करा, राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

(sanjay raut slams governor Bhagat Singh Koshyari over letter to cm uddhav thackeray)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI