विरोधकांनी खोट्या तलवारीचे घाव घालू नये, संजय राऊत यांचा इशारा

सरकारबद्दल कुणालाही मार्ग बदलता येणार नाही. महाभारतात अर्जुन कुरुक्षेत्राच्या मधोमध लढत होता. त्याने सर्व बाण परतवून लावले. हे महाभारताचं कथानक आहे. (sanjay raut)

विरोधकांनी खोट्या तलवारीचे घाव घालू नये, संजय राऊत यांचा इशारा
संजय राऊत, नेते, शिवसेना

नवी दिल्ली: विरोधकांना राज्य सरकारविरोधात घाव घालावा, ते त्यांचं कामच आहे. पण विरोधकांनी खोट्या तलवारीचे घाव घालू नये, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. (sanjay raut slams bjp over various issues)

संजय राऊत यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून मंत्र्यांना अडचणीत आणून सरकार हलवू शकतो असं केंद्र सरकारला वाटत असेल तर ते कदापी शक्य नाही. अशा तपास यंत्रणेंचा आघाडी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर घाव घातले पाहिजे. पण खोट्या तलवारीचे घाव घालू नका, असा इशारा राऊत यांनी दिला.

सरकार कुरुक्षेत्राच्या मध्यभागी

सरकारबद्दल कुणालाही मार्ग बदलता येणार नाही. महाभारतात अर्जुन कुरुक्षेत्राच्या मधोमध लढत होता. त्याने सर्व बाण परतवून लावले. हे महाभारताचं कथानक आहे. कधीही पांडवांनाच घेरलं जातं. कौरव अधर्माच्या बाजूने होते. कौरव हे असत्याचं प्रतिक आहे. सध्या सरकारलाही घेरलं गेलं आहे. श्रीकृष्णाच्या रथाप्रमाणे सध्याचं सरकार कुरुक्षेत्राच्या मध्यभागी आहे. आम्हीही हे बाण परतवून लावू, असं ते म्हणाले. विरोधक असले तरी ते महाराष्ट्रातील आहेत. आपण एकमेकांना ओळखतो. त्यामुळे खोटे आरोप करणं बरं नाही, असं त्यांनी सांगितलं.

विरोधकांशी मुकाबला करायचं ठरवलंय

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटले. ते अधूनमधून मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. ते आमचे मार्गदर्शक आहेत. देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. वडीलधारे आहेत. मधल्या काळात ते आजारी होते. त्यामुळे काल भेटले. ते भेटले की चर्चा होते. पण संशयाचे वातावरण नाही. पण आम्ही विरोधकांशी मुकाबला करायचं ठरवलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यपालांना टोला

यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून काही गोष्टींचं स्मरण करून दिलं म्हणता. आम्हीही त्यांना स्मरण करून देत असतो. 12 आमदारांची यादी त्यांच्याकडे आहे. त्याचं आम्हीही स्मरण करून देत असतो. त्यांना बाकी सर्व गोष्टींचं स्मरण होतं. फक्त यादीचंच विस्मरण होतं, असा चिमटाही त्यांनी काढला. (sanjay raut slams bjp over various issues)

 

संबंधित बातम्या:

तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, निलेश राणेंचा इशारा

माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हललीय, मुद्यावरून गुद्द्यावर आली, पडळकरांचा पुन्हा हल्लाबोल

सरोज म्हणाली नारळ फोडायचा आणि गाडीत बसायचं, पण इथे किती नारळ आहेत बघा, अजितदादांनी राष्ट्रवादीच्या आमदाराचे कान टोचले

(sanjay raut slams bjp over various issues)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI