साैरभ दास याचे खरे नाव योगेश शर्मा, अखेर मान्य केलेच, नेपाळमधून भारतात घुसखोरी केल्याचा आरोप, थेट..
कॉकरोच जनता पार्टीचा प्रमुख नेता साैरभ दास चांगलाच अडचणीत सापडला आहे. साैरभ दास मुळ नेपाळचा असून खोटे आधार कार्ड बनून त्याने भारतात प्रवेश केल्याचा आरोप आहे. हेच नाही तर तो नेपाळचा नागरिक आहे, असाहा आरोप असून हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले.

कॉकरोच जनता पार्टीचा नेता साैरभ दास चांगलाच अडचणीत फसल्याचे बघायला मिळत आहे. हा वाद साैरभ दास याला लंडनला जाण्यापासून दिल्ली विमानतळावर रोखण्यात आल्यापासून सुरू झाला. मात्र, सरकारवर आरोप करताना साैरभ दास स्वत:च अडकला आहे. साैरभ दास याचे खरे नाव हे नसून साैरभ दासचे खरे नाव योगेश शर्मा तो आपली खरी ओळख लपवून भारतात घुसला आहे. त्याने खोटे आधार कार्डही बनवल्याचा दावा केला जात आहे. यावरून मोठा वाद सुरू आहे. हेच नाही तर हे प्रकरण पार कोर्टापर्यंत पोहोचले आहे. अखेर साैरभ दास याने आपले नाव योगेश शर्मा असल्याचे मान्य केले. साैरभ दासची नागरिकता, जन्म गाव आणि नाव यावरून वाद वाढला आहे. मद्रास हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली. त्यात आरोप लावण्यात आला की, साैरभ दासचे खरे नाव योगेश शर्मा आहे.
तो मूळ नेपाळचा आहे. चोरून तो भारतात आला, भारताचे आधार कार्ड आणि पासपोर्ट त्याने तयार केला. हे प्रकरण वाढताना दिसले की, साैरभ दास याने एका मुलाखतीमध्ये काही गोष्टी मान्य केल्या. साैरभ दास याने म्हटले की, माझे नाव योगेश शर्मा आहे, हे एक गुप्त होते. साैरभ दासने म्हटले की, माझे जन्माचे हे नाव आहे. कुंडलीमध्ये पण हेच नाव लिहिलेले आहे.
माझ्या या नावाची चर्चा झाल्यानंतर माझ्या आईला पण धक्का बसला की, लोकांना हे नाव कसे समजले. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना साैरभ दासने म्हटले की, मी माझ्या आईला विचारले. मुळात हिंदू धर्मात जन्माच्या वेळी एक नाव दिले जाते. ते कुंडलीमध्ये गुप्त ठेवले जाते, ते कोणालाही सांगितले जात नाही. मी माझ्या आईला याबाबत माझ्या आईने सांगितले की, ते तुझ्या कुंडलीमधील नाव आहे.
सोनिया गांधी यांचे उदाहरण देत साैरभ दास याने म्हटले की, सोनिया गांधी यांनीही त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांचे क्रिश्चन नावाबद्दल सांगितले, जे त्यांच्या जन्मावेळी देण्यात आले होते. पण त्यांचे खरे नाव सोनिया गांधी हेच आहे. हिंदु लोकांमध्ये असेच होते. या गोष्टीवरून वाद होण्याचे कारण हे आहे की, मी कॉकरोच नजत पार्टीकडून आहे. 30 ऑक्टोबर रोजी मद्रास हायकोर्टात याबाबत याचिका दाखल करण्यात आली.23 ऑक्टोबर रोजी साैरभ दास याला दिल्ली विमानतळाहून लंडनला जाताना रोखण्यात आले.