AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिर संकुलात शेषावतार मंदिर, आराखडा तयार, काय आहे खास घ्या जाणून

श्री रामजन्मभूमी संकुलात बांधल्या जाणाऱ्या शेषावतार मंदिराचे नवे रेखाचित्र आणि डिझाइन तयार करण्यात आले आहे. भूमिपूजनानंतर बांधकामाला सुरुवात झाली आहे. 31 डिसेंबरपर्यंत हे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

राम मंदिर संकुलात शेषावतार मंदिर, आराखडा तयार, काय आहे खास घ्या जाणून
ram mandir (5)Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jul 29, 2024 | 10:39 PM
Share

श्री रामजन्मभूमी संकुलात शेषावतार मंदिर उभारले जाणार आहे. त्याचे रेखाचित्र आणि आराखडा तयार करण्यात आला आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या व्यासपीठाची उंची श्री राम मंदिराच्या गर्भगृहाच्या व्यासपीठाच्या समांतर असेल. शेषावतार मंदिरासह संकुलात उभारण्यात येणाऱ्या सर्व मंदिरांतील मूर्ती पांढऱ्या संगमरवराच्या असतील, असे बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी स्पष्ट केले. तर, मंदिराचे संपूर्ण काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

शेषावतार हा लक्ष्मणजींचा अवतार मानला जातो. त्यामुळे श्री रामजन्मभूमी संकुलातील सर्वोच्च ठिकाणी हे शेषवतार मंदिर उभारले जात आहे. मंदिराच्या भूमिपूजनानंतर बांधकामासाठी नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार आता बांधकाम सुरू आहे. विशेष म्हणजे शेषावतार मंदिराच्या गर्भगृहाच्या व्यासपीठाची उंची श्री रामजन्मभूमी मंदिराच्या गर्भगृहाच्या व्यासपीठा इतकीच आहे.

श्री राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, शेषावतार मंदिराचा नव्या पद्धतीने वापर केला जात आहे. त्याचे नवे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. त्याची उंची मंदिराइतकीच राहावी यासाठी प्रयत्न केले जातील. मूर्ती बनविण्याच्या ऑर्डर देण्यात आल्या आहेत. नोव्हेंबरपर्यंत तयार होणाऱ्या सर्व मूर्ती पांढऱ्या संगमरवरी असतील. मंदिर बांधकाम समिती लवकरच बांधकामाच्या मार्गात कोणते अडथळे आहेत यावर विचारमंथन करणार आहे. मंदिराच्या बांधकामाच्या रेखांकन आणि रचनेनुसार सुरक्षेबाबत ग्राउंड लेबलवरही चर्चा केली जात आहे. यासोबतच मंदिर उभारणीचे कामही डिसेंबरच्या विहित मुदतीत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

शेषावतार मंदिरामधील मूर्ती तयार करण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पहिल्या बैठकीत आढावा घ्यावा लागेल. सर्व निर्णय तांत्रिक निर्णय होतील. पहिल्या मजल्यावर अशी व्यवस्था असेल तर की जर एखादा मुलगा तिथे पोहोचला तर त्यालाही मंदिरातील मूर्ती पहाता येतील. मात्र. त्यावर सुरक्षेसाठी जाळी बसवण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याचे एकमेव ध्येय आहे असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत