AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताशी नडला आणि आता खड्ड्यात पडला, मालदीवला मोठा झटका

Big blow to mohamed muizzu : भारतविरोधी भूमिकी घेऊन चीनला खूश करण्याचा डाव मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. कारण ज्या गोष्टीसाठी त्यांनी भारतासोबत दुश्मनी घेतली तो डाव आता उलटा पडू शकतो. मालदीवला चीनकडून मोठ्या मदतीची अपेक्षा होती. पण अजून तरी त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

भारताशी नडला आणि आता खड्ड्यात पडला, मालदीवला मोठा झटका
| Updated on: Feb 21, 2024 | 6:01 PM
Share

India maldive row : भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. मालदीवच्या नव्या राष्ट्राध्यक्षांची भारतविरोधी भूमिका त्यानाच अडचणीत आणू शकते. भारताने नेहमीच आपल्या शेजारील देशांना मदतीचा हात दिली आहे. संकट काळात नेहमीच भारत छोट्या देशांना मदत करतो. पण चीन समर्थक मानले जाणारे मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांना आता याचा फटका बसू शकतो. एकीकडे अनेक देश भारसोबत मैत्री करण्याच्या प्रयत्नात असताना मालदीवने मात्र भारतासोबतचे संबंध बिघडवले आहेत. आता असे समोर येत आहे की मालदीववर प्रमाणापेक्षा जास्त कर्ज झाले आहे.

मालदीव अडकणार संकटात

मालदीववर विदेशी कर्ज 4.038 अब्ज डॉलर्स इतके वाढले आहे. ज्यामुळे मालदीव येत्या काही वर्षात अडचणीत येणार आहे. संकटातून बाहेर येण्यासाठी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे आता चीन आणि तुर्की यांच्याकडून मदतीची अपेक्षा करत आहे. मात्र कोणताच देश त्यांना मदतीसाठी पुढे येताना दिसत नाहीये

मालदीवचे देशांतर्गत उत्पन्न हे 5.6 अब्ज डॉलर्स इतके आहे. उत्पन्नापेक्षा कर्ज जास्त झाल्याने मालदीव कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. आगामी काळात मालदीव मोठ्या संकटात सापडणार आहे.

चीनकडून मदत मिळावी म्हणून मुइज्जू यांनी भारतविरोधी भूमिका घेतली.  मालदीवने आता तुर्कीकडे ही मदत मागितली आहे. त्यामुळे आता हे दोन्ही देश मालदीवला किती मदत करतात हे पाहावं लागेल.

IMF ने दिली होता मालदीवला इशारा ?

मालदीववर चीनचे सर्वाधिक कर्ज आहे. जे १.३ अब्ज इतके आहे. एकूण विदेशी कर्जाच्या ३० टक्के कर्ज हे चीनचे आहे. मालदीवने चीनकडे आणखी मुदत मागितली आहे. पण सध्या चीन किंवा तुर्कस्तान यापैकी कोणीही मदतीसाठी पुढे येताना दिसत नाहीये.

चीन आपल्या फायद्यासाठी मालदीवचा वापर करत आहे. चीनला बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या प्रोजोक्ट अंतर्गत मालदीवमध्ये मोठ्या पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. पण यामुळे मालदीववर आणखी कर्जाचा बोजा पडणार आहे.

चीनच्या प्रकल्पांमुळे पाकिस्तान, केनिया, टांझानिया यांसारखे अनेक देश आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. आता मालदीव पण त्याच मार्गावर जात आहे. मालदीवमधील अनेक लोकांना हे नकोय पण येथील नवीन सरकार चीनपुढे झुकताना दिसत आहे. एप्रिल महिन्यात मालदीवच्या संसदेसाठी निवडणुका होणार आहे. भारतविरोधी भूमिका घेत ते याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

चिनी जहाज दुसरीकडे मालदीवच्या माले बंदराजवळ येणार आहे. मालदीवने म्हटले होते की, चिनी जहाज फक्त इंधनासाठी थांबेल ते कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण करणार नाहीत.

भारत विकसित करणार बेट

भारताने देखील आता मालदीवला शह देण्यासाठी लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांवर विमानतळ बांधणार आहे. मोदी सरकारने हवाई पट्टीचा विस्तार करण्यासाठी भारतीय नौदलाला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मालदीवला ही मोठा झटका लागला आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...