Shiv Sena: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा यूपीएच्या उमेदवाराला, राऊतांच्या उपस्थितीत शरद पवारांनी केलं जाहीर

| Updated on: Jul 17, 2022 | 5:09 PM

यानिमित्ताने राज्यात एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेतील काही नेत्यांची भाजपासोबत उद्धव ठाकरे यांनी जुळवून घ्यावे, ही भूमिका पक्ष नेतृत्वाने नाकारल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या खासदारांच्या भूमिमेकमुळे आणि द्रौपदी मुर्मु या आदिवासी असल्याने त्यांना पाठिंबा दिल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. मात्र हा निर्णय दबावाखाली घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Shiv Sena: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा यूपीएच्या उमेदवाराला, राऊतांच्या उपस्थितीत शरद पवारांनी केलं जाहीर
शिवसेनेचा पाठिंबा यूपीएच्या उपराष्ट्रपती उमेदवाराला
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली – राष्ट्रपतीपदासाठी शिवसेना खासदारांच्या (Shivsena MP)मागणीनुसार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मु्र्मु यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना युपीएच्या (UPA candidate)उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देणार आहे. आज नवी दिल्लीत शरद पवारांच्या घरी काँग्रेससह विरोधकांची शरद पवारांच्या घरी एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या परिषदेत युपीएकडून मार्गारेट अल्वा यांच्या नावाची उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. शरद पवार यांनी ही घोषणा केली. यावेळी अल्वा यांच्या उमेदवारीला कोणकोणत्या पक्षांचा पाठिंबा आहे, ही यादी जाहीर केली, त्यात शिवसेनेचे नावही त्यांनी घेतले. तसेच या विरोधकांच्या बैठकीला शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते. त्यांना उपराष्ट्रपतीपदाबाबत शिवसेनेची भूमिका काय अशी विचारणा केली असता, आत्ता पवारांनी जे जाहीर केले तीच शिवसेनेची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यानिमित्ताने शिवसेनेची आगामी भूमिका ही युपीएसोबत ्सेल हे शिवसेनेतर्फे स्पष्ट करण्यात आल्याचे दिसते आहे.

शिवसेना युपीए घटकपक्षांसोबत

यानिमित्ताने शिवसेना ही काँग्रेस आणि युपीए पक्षांसोबत आहे, असे स्पष्ट संकेत शिवसेना पक्षप्रमुखांनी दिल्याचे मानण्यात येत आहे. मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देणाऱ्या यादीत शिवसेनेचेही नाव आहे. काँग्रेस, डीएमके, सपा, एनसीपी, आरजेडी, शिवसेना, टीआरएस, आरएसपी, मनी काँग्रेस, एमडीएमके, सीपीआय, सीपीआयएम, जेएनएल, नॅशनल काँग्रेसने अल्वा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. असे शरद पवारांनी सांगितले. अल्वांच्या उमेदवारीबाबत ममता बॅनर्जींना संपर्क साधला आहे, पण त्या परिषदेत बीझी होत्या. संपर्क झाला नाही. तसेच केजरीवाल यांनाही संपर्क साधला आहे. त्यांच्या पाठिंब्याबाबत दोन दिवसात सांगणार आहेत, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.

भाजपासोबत जायचे नाही ही उद्धव ठाकरेंची स्पष्ट भूमिका

यानिमित्ताने राज्यात एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेतील काही नेत्यांची भाजपासोबत उद्धव ठाकरे यांनी जुळवून घ्यावे, ही भूमिका पक्ष नेतृत्वाने नाकारल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या खासदारांच्या भूमिमेकमुळे आणि द्रौपदी मुर्मु या आदिवासी असल्याने त्यांना पाठिंबा दिल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. मात्र हा निर्णय दबावाखाली घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे खासदार कुणाला मतदान करणार, यावर शिवसेनेतील खासदारांची फूट ठरणार असल्याचे मानण्यात येते आहे.