AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena Supreme Court Hearing : धनुष्यबाण चिन्ह कोणाला द्यायचं नसेल तर गोठवा, आजच्या सुनावणीतले 25 महत्वाचे मुद्दे

Shivsena Supreme Court Hearing : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची? या बहुचर्चित खटल्याची आजची सुनावणी संपली आहे. उद्धव ठाकरे गटाने आज अंतिम युक्तीवाद केला. ठाकरे गटाचे दुसरे वकिल देवदत्त कामत यांनी बाजू मांडली

Shivsena Supreme Court Hearing : धनुष्यबाण चिन्ह कोणाला द्यायचं नसेल तर गोठवा, आजच्या सुनावणीतले 25 महत्वाचे मुद्दे
Shivsena Hearing
| Updated on: Aug 20, 2026 | 4:17 PM
Share

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची? या खटल्याची आजची सुनावणी संपली आहे. आज ठाकरे गटाने अंतिम युक्तीवाद केला. कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत हे ठाकरे गटाचे दोन वकिल आहेत. कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद काल संपला. आज देवदत्त कामत यांनी जवळपास अर्धातास युक्तीवाद केला. त्यानंतर पुढच्या आठवड्यात एकनाथ शिंदे शिवसेनेचे वकिल न्यायालयात आपली बाजू मांडतील. उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तीवाद हा विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही, यावर केंद्रीत आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच निकाल ऐतिहासिक असेल. सगळ्या देशाचं या निकालाच्या खटल्याकडे लक्ष लागलं आहे. 2023 साली निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवलं. त्यांच्या गटाला अधिकृत शिवसेना ठरवलं.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलय. कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तीवादात निवडणूक आयोगाने कसे चुकीचे निर्णय घेतले? हे सांगताना निवडणूक आयोगाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मागच्या दोन वर्षांपासून सतत या खटल्याची सुनावणी पुढे जात होती. पण आता यावर नियमित सुनावणी सुरु झाली आहे.

ठाकरे गटाचे दुसरे वकिल देवदत्त कामत यांच्या युक्तीवादातील महत्वाचे मुद्दे

1 चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातील संख्याबळ पाहून घेतला.

2 आम्ही अध्यक्षांवरील विश्वास गमावलेला आहे.

3 10 व्या सूचीत आमदार अपात्रतेबद्दल सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

4 सुभाष देसाई केसचा दाखला दिला.

5 विधानसभा अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही.

6 सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार आहे, असं कामतांनी म्हटलेलं आहे.

7 विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही. पण सुप्रीम कोर्टाने त्यावर निर्णय घेतल्याची अनेक जुनी प्रकरणं आहेत. याचे दाखले कामत यांनी दिले.

8 आमदारांची टर्म संपली असली तरी कोर्टाचा निर्णय महत्वाचा आहे.

9 फूट पडली आहे की नाही याचा सोक्षमोक्ष लावा.

10 आमच्याकडे अधिकार आहेत यात कोणतीही शंका नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

11 आज युक्तीवाद संपवायचाय, मी चिन्हाच्या मुद्यावर येतो.

12 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का?

13 विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळे आहेत. राजकीय पक्षाचं महत्व जास्त असतं.

14 अपात्रतेच्या निर्णयाआधीच आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदेंना देऊन टाकलं.

15 अपात्रतेचा निर्णय झाला असता, तर चित्र वेगळं असतं.

16 चिन्ह कोणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा, असं कामत म्हटलेलं आहे. कपिल सिब्बल यांनी सुद्धा अशीच मागणी केली होती.

17 विधिमंडळ पक्ष फुटला तर चिन्हाचा संबंध येत नाही.

18 राजकीय पक्ष फुटला तर चिन्हाचा संबंध येतो.

19 शिवसेनेत राजकीय पक्ष नाही, विधिमंडळ पक्ष फुटला. निवडणूक आयोगाने विधिमंडळातील संख्याबळ पाहून निर्णय दिला.

20 एक तृतीयांश आहोत, म्हणून फुटतोय हे कायद्याने अमान्य आहे.

21 विधिमंडळ पक्षाचा राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही.

22 राजकीय संघटनेत आमच्याकडे बहुमत होतं. कागदपत्र सादर केली. 19 लाखापेक्षा जास्त सदस्य आमच्याकडे, शिंदेकडे 4 लाख सदस्य.

23 पक्षांतर निर्णयावर अध्यक्ष अपयशी ठरल्यास कोर्ट निर्णय घेऊ शकतं.

24 आमदार संख्याबळावर निर्णय दिल्यास परिशिष्ट 10 कागदावर राहिलं. अराजकता माजेल.

25 देवदत्त कामत यांचा आजचा युक्तीवाद संपला.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात