मित्रांसोबत फुटबॉल खेळत असताना खासदाराचा मृत्यू, खळबळ उडवणारी घटना, देशात..
नुकताच एक धक्कादायक अशी घटना पुढे येताना दिसत आहे. चक्क एका खासदाराचा फुटबॉल खेळताना मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली. खासदार आपल्या मित्रांसोबत फुटबॉल खेळत असताना ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

एक धक्कादायक अशी घटना पुढे येताना दिसत आहे. या घटनेने देशभरात मोठी खळबळ उडाली. चक्क खासदार फुटबॉल खेळत होते. यावेळी कोणीही विचार करणार नाही, अशी घटना घडली. चक्क फुटबॉल खेळत असताना खासदाराचा मृत्यू झाला. फुटबॉल खेळत असताना कोसळल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर मृत्यू घोषित करण्यात आले. या घटनेने खळबळ उडाली. शिलाँगचे खासदार रिकी एजे सिंगकॉन हे आपल्या मित्रांसोबत फुटबॉल खेळत होते. मावलाई माविओंग क्रीडांगणावर त्यांचा फुटबॉल सामना चांगलाच रंगला होता. फुलबॉल सामना रंगात असताना खासदार अचानक मैदानात कोसळले. त्यानंतर उपस्थित लोकांनी त्यांना लगेचच रूग्णालयात दाखल केले. माविओंग कम्युनिटी हेल्थ सेंटर येथे त्यांना नेण्यात आले.
पण कम्युनिटी हेल्थ सेंटर येथे लगेचच डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले. त्यांना डॉ. एच. गॉर्डन रॉबर्ट्स रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. खासदार रिकी एजे सिंगकॉन यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टायनसॉन्ग, व्हीपीपी अध्यक्ष आर्डेंट मिलर बसियावमोइट, अनेक खासदार, आमदार रूग्णालयात पोहोचले.
खासदार रिकी एजे सिंगकॉन यांनी तीन वेळा राहिलेले काँग्रेसचे खासदार विन्सेंट एच. पाला यांचा तब्बल 3 लाखाहूनही अधिक मतांनी पराभव केला. हा त्यांचा विजय मेघालयाच्या राजकीय परिदृश्यात मोठा बदल घडवून आणणारा होता. रिकी एजे सिंगकॉन यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. कोणालाही विश्वास बसत नाहीये की, ते आज आपल्यात नाहीत.
रिकी एजे सिंगकॉन यांच्या जाण्याने मेघालयाच्या राजकारणात एक मोठी पोकळी नक्कीच निर्माण झाली. या प्रकरणात अधिकचा तपास केला जात असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यांच्या कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिकी एजे सिंगकॉन यांच्या निधनाबद्दल कळताच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने त्यांच्या घरी धाव घेतली. आज आपला नेता आपल्यात नाही, यावर कोणालाही विश्वास बसत नाही. मेघालयच्या राजकारणातील अत्यंत मोठे नाव रिकी एजे सिंगकॉन राहिले आहे.