CJP च्या आदोंलनानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीचा धक्कादायक निकाल, भाजपला थेट…, राजकारणातून मोठी बातमी

नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर आता सीजेपीच्या आंदोलनानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

CJP च्या आदोंलनानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीचा धक्कादायक निकाल, भाजपला थेट..., राजकारणातून मोठी बातमी
CJP
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 14, 2026 | 3:32 PM

नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमधील जंतर मंतरवर तब्बल 35 दिवस आंदोलन सुरू होतं. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला. या मोर्चाला हिंसक वळण लागलं, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला तर काही ठिकाणी पोलिसांवर देखील दगडफेक झाल्याच्या घटना घडल्या, त्यानंतर दबाव वाढल्यामुळे अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. दरम्यान त्यानंतर शाळा सुधारण्यासाठी देखील कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने राजस्थानमध्ये मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र राज्यस्थानमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर भाजपासाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.

राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य स्वस्थांच्या निवडणुकामध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. राजस्थानमध्ये 10 महापालिका निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार या निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. 10,245 वार्डांपैकी 8068 वार्डांचा निकाल जाहीर झाला आहे. 3323 वार्डात भाजपाने विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेसने देखील चांगली कामगिरी केली असून, 2962 वार्डमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर जयपूर महापालिका निवडणुकीमध्ये भगवा दल पक्षाचा दबदबा दिसून आला आहे. जयपूर महापालिकेतील 150 जागांपैकी 108 जागा भगवा दलला मिळाल्या आहेत.

दुसरीकडे भीलवाडा महानगरपालिकेत भाजपाचा एकतर्फी विजय झाला आहे. 70 जागांपैकी आतापर्यंत 58 जागांचा निकाल लागला आहे, त्यापैकी 37 जागांवर भाजपचा विजय झाला आहे. तर या ठिकाणी काँग्रेसने 9 जागा जिंकल्या आहे. तर जोधपूरमध्ये सध्या काटे की टक्कर पहायला मिळत आहे. जोधपूर निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी 44- 44 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता इथ अपक्ष उमेदवार कोणाला साथ देणार? यावर सत्ता स्थापनेचं गणित जुळून येणार आहे. तर दुसरीकडे अजमेरमध्ये मात्र काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. अजमेरमध्ये 80 पैकी 37 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर 32 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. इथे 11 जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us