Space : फायटर प्लेन उडवण्यात मास्टर, कोण आहेत शुभांशु शुक्ला? जे स्पेसमध्ये रचणार नवीन इतिहास
Space : मिशनवर येणारे अनुभव भारतीयांसोबत शेअर करण्याची अपेक्षा शुभांशु शुक्ला त्यांनी व्यक्त केली. मिशनबद्दल कुतूहल असल्याच त्यांनी सांगितलं. हे मिशन 14 दिवस चालणार आहे.

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला लवकरच नवीन इतिहास रचणार आहेत. आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर (ISS) जाणारे ते पहिले भारतीय अवकाशवीर आहेत. त्यांना एक्सिओम मिशन 4 मध्ये (एक्स-4) पायलट म्हणून निवडण्यात आलं आहे. हे एक खासगी अवकाश मिशन आहे. स्पेसएक्स ड्रॅगन यानातून ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणार आहेत. शुभांशु शुक्ला हे इंडियन एअर फोर्समध्ये पायलट आहेत. नासाचे माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन यांच्या नेतृत्वाखालील पथकामधून ते ISS वर जाणार आहेत. मिशन कमांडर म्हणून शुभांशु शुक्ला यांची भूमिका असेल. त्यांच्यासोबत दोन मिशन एक्सपर्ट पोलंडचे स्लावोज उज्नान्स्की-विस्नीव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू असतील.
या मिशनद्वारे फक्त इस्रोचेच अंतराळवीर ISS वर जाणार नाहीयत, तर पोलंड आणि हंगेरीच्या अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर मुक्काम करण्याची संधी मिळणार आहे. मिशनवर येणारे अनुभव भारतीयांसोबत शेअर करण्याची अपेक्षा शुभांशु शुक्ला त्यांनी व्यक्त केली. मिशनबद्दल कुतूहल असल्याच त्यांनी सांगितलं. देशाच्या विभिन्न भागातून सांस्कृतिक वस्तू घेऊन जाण्याची त्यांची योजना आहे. ISS वर योगासन करण्याची इच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केली.
Ax-4 सारखे खासगी मिशन्स
हे मिशन 14 दिवस चालणार आहे. या मिशनमध्ये सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात वैज्ञानिक प्रयोग, आऊटरिच प्रोग्राम आणि कामर्शियल कार्यक्रम असतील. Ax-4 मिशन हे खासगी अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत घेऊन जाण्याच मिशन आहे. नासाच्या ISS कार्यक्रमाचे संचालक डाना वीगेल यांच्यानुसार, Ax-4 सारखे खासगी मिशन्स हे पृथ्वीच्या खालच्या कक्षेची लोकांना भ्रमंती घडवून एक नवीन अर्थव्यवस्था विकसित करण्याचा मार्ग आहे. व्हिटसन यांनी Ax-4 चालक दलाच कौतुक केलं.
शुभांशु शुक्ला कोण आहेत?
10 ऑक्टोंबर 1985 रोजी शुभांशु यांचा जन्म लखनऊमध्ये झाला. जून 2006 मध्ये फायटर पायलट म्हणून ते इंडियन एअर फोर्समध्ये रुजू झाले. त्यानंतर मार्च 2024 मध्ये ग्रुप कॅप्टन बनले. शुभांशु यांनी Su-30 MKI, MIG-21, MiG-29, जॅग्वार, हॉक, डॉर्नियर आणि An-32 सह विभिन्न विमानांची 2,000 पेक्षा अधिक उड्डाण केली आहेत.
2019 मध्ये रशियाच्या यूरी गगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये अंतराळवीर बनण्याच त्यांनी प्रशिक्षण घेतलं. भारताच्या गगनयान मिशनसाठी इस्रोने निवड केली. हा देशातील पहिला मानव अंतरिक्ष उड्डान कार्यक्रम आहे. नासा-एक्सिओम स्पेस सहयोग अंतर्गत आयएसएसचा प्रवास करणारे इस्रोचे पहिले अंतराळवीर आहेत.
