सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात आता महाराष्ट्र कनेक्शन; अरुण गवळीचे नाव पुन्हा जोडले गेले

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची रविवारी, 29 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता मानसातील जवाहरके गावात हत्या करण्यात आली. मुसेवालावर सुमारे 40 राऊंड गोळीबार करण्यात आला. मुसेवाला यांच्या शरीरावर 19 जखमा आढळल्या.

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात आता महाराष्ट्र कनेक्शन; अरुण गवळीचे नाव पुन्हा जोडले गेले
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 12:23 AM

नवी दिल्लीः पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून (Murder of Punjabi singer Sidhu Musewala) प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील कुख्यात गुंड अरुण गवळी (Arun Gavali) टोळीशी जोडले गेले आहेत. पंजाब पोलिसांनी ओळखलेल्या 8 शार्प शूटर्सपैकी संतोष जाधव हा गवळी टोळीचा हस्तक असल्याचे सांगितले जात आहे. संतोष जाधव हा पुण्याचा रहिवासी असून 29 मे रोजी मुसेवालावर गोळी झाडण्यात आली त्यामध्ये त्याचा सहभाग होता अशी माहिती देण्यात आली आहे.

मुंबईहून पंजाबला संतोष जाधवला बोलावून घेण्यात आले होते. तर त्याच्यासोबत महाराष्ट्रातील सौरभ महाकाळही आला होता. ही धक्कादायक माहिती दिल्यानंतर पंजाब पोलिसांनी या घटनेची सविस्तर माहिती देण्यात आी असून त्यांनी मुंबई पोलिसांकडून सहकार्य मागितले आहे. पंजाब पोलिसांनी या घटनेची माहिती पुणे पोलिसांना देण्यात आल्यानंतर संतोष जाधवचा शोध सुरु झाला आहे.

आतापर्यंत लॉरेन्स गँगचे नाव आहे

सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात आतापर्यंत गँगस्टर लॉरेन्स टोळीचे नाव समोर आले होते. लॉरेन्स गँगमधील कॅनडाचा गँगस्टर गोल्डी बार याने स्वतः याची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर याच टोळीतील सचिन थापन बिश्नोई याने टीव्ही चॅनलवर फोन करून हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर आता गवळी टोळीचे नावही समोर आले आहे. त्यामुळे लॉरेन्स टोळीसह गवळी टोळीचाही खून प्रकरणात हात आहे की काय, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी या 8 शार्प शूटर्सची ओळख पटवली

मुसेवाला हत्येप्रकरणी पोलिसांनी 4 राज्यांतील 8 शार्प शूटर्सची ओळख पटवली गेली आहे. यामध्ये पंजाबमधील तरनतारन येथील जगरूपसिंग रूपा व मनप्रीत मन्नू, हरियाणातील सोनीपत येथील प्रियवर्त फौजी व मनप्रीत भोलू, महाराष्ट्रातील पुणे येथील संतोष जाधव व सौरव महाकाल, सीकर, राजस्थान, भटिंडा, पंजाब येथील सुभाष बानुदा यांचाही या हल्ल्याप्रकरणात समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुन्हेगारी जगताचा ‘डॅडी’

अरुण गवळी हा 90 च्या दशकातील मुंबईचा सुपारीचा बादशहा म्हणून ओळखला जा होता. पांढरी टोपी आणि पांढरा कुर्ता परिधान केलेल्या गवळी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा छत्तीसचा आकडा होता. डी कंपनी आणि गवळी टोळीमध्ये टोळीयुद्ध काय सुरू होते.अरुण गवळी गुन्हेगारी जगतात ‘डॅडी’ म्हणून ओळखला जातो. 1990 मध्ये मुंबईत टोळीयुद्ध जोरदारपणे सुरू असतानाच देशातील अनेक गुंडांनी मात्र देश सोडून पळ काढावा लागला होता.

 चिंचपोकळीतून निवडणूक

1988 मध्ये मुंबईत पोलीस चकमकीत रामा नाईक मारला गेल्यानंतर गवळीने त्या टोळीची कमान हाती घेतली. दाऊदने रामा नाईकचे एन्काऊंटर केल्याचा संशय अरुण गवळीला होता. त्यानंतर त्यांच्यात कायम वैर सुरू झाले. 2004 मध्ये गवळीने अखिल भारतीय लष्कराची स्थापना करुन त्यांनी मुंबईतील चिंचपोकळीतून निवडणूकही जिंकली.

मुसेवाला यांची २९ मे रोजी हत्या

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची रविवारी, 29 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता मानसातील जवाहरके गावात हत्या करण्यात आली. मुसेवालावर सुमारे 40 राऊंड गोळीबार करण्यात आला. मुसेवाला यांच्या शरीरावर 19 जखमा आढळल्या. त्यापैकी 7 गोळ्या थेट मुसेवाला यांना लागल्या होत्या. गोळी झाडल्यानंतर १५ मिनिटांत मुसेवाला मारला गेला.

Non Stop LIVE Update
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?.
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा.
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?.
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.