गडचिरोलीच्या आश्रम शाळेतील 6 मुलींना सर्पदंश, करा ही सोपी ट्रीक परिसरात असलेले साप दूर निघून जातील, नो टेन्शन
गडचिरोमध्ये नुकतीचं एक दुर्दैवी घटना घडली आहे, एका आश्रम शाळेमध्ये तब्बल सहा मुलींना सर्पदंश झाला, या घटनेत तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. अशा काही ट्रीक्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही सापांना घरापासून दूर ठेवू शकतात.

काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली होती, झोपेत असलेल्या सहा मुलींना विषारी सापाने दंश केला. सर्पदंशामुळे या सहा पैकी तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. तर तीन मुलींवर उपचार सुरू आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घर किंवा घराच्या परिसरात साप निघण्याचा घटनांमध्ये वाढ होते. विशेष: रात्रीच्या वेळी अंधारात साप न दिसल्यामुळे किंवा झोपेत असल्यामुळे सर्पदंश होण्याची शक्यता वाढते. रात्री झोपेत साप चावल्यामुळे सर्पदंश झाल्याचं लक्षात येत नाही, त्यामुळे उपचारासाठी उशिर होतो, अशा स्थितीमध्ये मृत्यू होण्याची देखील शक्यता असेत. या मुलींना जो साप चावला तो मण्यार जातीचा असल्याची माहिती समोर येत आहे. भारतामध्ये सापांच्या ज्या चार प्रमुख विषारी जाती आढळून येतात, त्यातील ही एक सापाची प्रजाती आहे.
भारतामध्ये नाग, मण्यार, फुरसे, घोणस या चार प्रमुख सापांच्या विषारी प्रजाती आहेत. त्यातील मण्यार ही सापांची प्रजात सर्वात जास्त खरतनाक आहे. या सापाला सायलंट किलर देखील म्हटलं जातं. हा साप निशाचर असतो, त्यामुळे तो शिकारीसाठी शक्यतो रात्रीच बाहेर पडतो. अशावेळी तो तुमच्या अंथरुणात देखील घुसू शकतो, थोडीजरी हालचाल झाली तरी देखील तो तुम्हाला चावा घेऊ शकतो. या सापाचं वैशिष्ट म्हणजे हा साप चावल्याचं कळत नाही, त्यामुळे उपचाराला वेळ होतो आणि व्यक्ती दगावतो.
सापांना दूर ठेवण्याच्या अनेक ट्रीक आहेत, त्यापैकी एक महत्त्वाची ट्रीक म्हणजे कधीही जमिनीवर झोपू नका, नेहमी झोपण्यासाठी पलंग किंवा बाजेचा वापर करा, त्यामुळे सर्पदंशाचा धोका टळतो. तुम्ही जर जमिनीवर झोपले असाल तर तुम्हाला सर्पदंश होऊ शकतो. तसेच पलंगावर कधीही डिझायन असलेलं बेडशिट अंथरू नका, त्याऐवजी पांढऱ्या बेडशिटचा उपयोग करा, पांढऱ्या बेडशिटवर साप लगेच दिसतो, इतर कलरच्या बेडशिटवर साप लवकर दृष्टीस पडत नाही.
तसेच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घराच्या परिसरात गवत वाढतं, लपण्यासाठी जागा मिळाल्याने साप थेट तुमच्या घरापर्यंत पोहचतात, त्यामुळे कधीही पावसाळ्यात गवत वाढू देऊ नका, तुमच्या घराचा परिसर स्वच्छ ठेवा, यामुळे साप तुमच्या परिसरात फिरकणार देखील नाहीत.