Smit Machachchar: डोळ्यासमोर अंधार, ती प्रतिमा दिसली अन्… स्मिथ माछर यांनी सांगितलेला अनुभव ऐकून अंगावर येईल काटा
Smit Machachhar Experince In Flydubai: स्मिथ माछरवर इतका हल्ला होऊनही त्याला एवढे शौर्य कसे आले याबद्दलचा जो अनुभव त्याने सांगितला तो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी फ्लाय-दुबई विमानाचे भारतीय पायलट कॅप्टन स्मित माछर यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. कॅप्टन माछर यांनी अपघाताच्या कठीण काळातील आपले अनुभव बोलून दाखवला. सहवैमानिकांने हल्ला केल्यानंतर एवढं शौर्य कुठुन आले असं विचारले असता त्यांनी जे बोलून दाखवले त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
स्मिथ म्हणाला की, ” डोळ्यासमोर अंधार झाला होता, मी खाली पडलो होतो आणि नंतर डोळ्यासमोर एक प्रतिमा दिसली आणि मी उठलो, ती प्रतिमा म्हणजे हनुमानाची. या बिकट काळात हनुमान चालिसेने मला धैर्य दिले. मी नियमितपणे हनुमान चालिसेचे पठण करतो, ज्यामुळे मला आत्मविश्वास मिळतो. जणू काही हनुमानाने माझे आणि विमानातील सर्वांचे रक्षण केले.”
पंतप्रधान मोदींनी कॅप्टन माछर यांच्या धैर्याची प्रशंसा केली आणि ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. विमानात अचानक आलेल्या संकटातही त्यांनी परिस्थिती कशी हाताळली. बुधवारी फ्लाय-दुबई विमानात सह-पायलटसोबत झालेल्या झटापटीत कॅप्टन माछर गंभीर जखमी झाले होते. असे असूनही, त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला, ज्यामुळे नंतर क्रू आणि प्रवाशांना परिस्थिती हाताळण्यास मदत झाली
पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान कॅप्टन माछर यांनी सांगितले की, “मी हनुमान चालिसेचे पठण रोज करतो, हनुमान चालिसा मला कठीण परिस्थितीत मानसिक बळ देते. विमानावरील संकटाच्या वेळीही मला त्यांची शक्ती जाणवली. मला विश्वास होता की हनुमान माझे रक्षण करतील म्हणूनच अत्यंत बिकट परिस्थितीतही मी धैर्य गमावले नाही.”
संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनीही कॅप्टन माछर यांच्या धैर्याची प्रशंसा केली. यापूर्वी पंतप्रधानांनी त्यांच्या पत्नी आणि आई-वडिलांशी फोनवर संवाद साधला होता आणि कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले होते. पंतप्रधानांनी कॅप्टन माछर यांना राष्ट्रीय नायक संबोधून त्यांच्या धैर्याची जाहीरपणे प्रशंसाही केली.
फ्लाय-दुबईचे बोईंग ७३७ विमान अंदाजे ३४,००० फूट उंचीवर उडत होते. कॉकपिटमध्ये कॅप्टन माछर आणि सह-वैमानिक यांच्यात झटापट झाली. ज्यात ते गंभीर जखमी झाले. परिस्थिती इतकी बिघडली की विमान वेगाने खाली उतरू लागले. विमान अंदाजे २३,००० फूट प्रति मिनिट वेगाने खाली उतरू लागले आणि अंदाजे १५,६०० फूट उंचीवर पोहोचले. गंभीर जखमी असूनही, कॅप्टन माछर यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला. क्रू सदस्य आणि प्रवाशांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली. विमान सुरक्षितपणे उतरले. या घटनेनंतर कॅप्टन माछर यांच्यावर उपचार सुरू आहेत.
